देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील एक – बँक ऑफ महाराष्ट्रने निधी आधारीत कर्ज (एमसीएलआर) व्याजदरामध्येमध्ये सलग चौथ्या महिन्यात कपात केली आहे.

विविध कालावधीतील निधी आधारीत कर्ज व्याजदर (एमसीएलआर) ७ जुलै २०२० पासून प्रचलित दरापेक्षा २० अंकांनी कमी करण्यात आला आहे.

बँकेचा एक महिन्याचा निधी आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) अनुक्रमे ७% (पूर्वीचा ७.२०%) आणि ७.१०% (पूर्वीचा ७.३०%) तर तीन महिने आणि सहा महिन्यांचा निधी आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) ७.२०% (पूर्वीचा ७.४०%) आणि ७.३०% (पूर्वीचा ७.५०%) करण्यात आला आहे. एक वर्षांचा निधी आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) ७.५०% (पूर्वीचा ७.७०%) झाला आहे.

बँकेचे एमसीएलआरमधील कपात करण्याचे उद्दीष्ट आर्थिक विकासास आणि औद्योगिक विकासास समर्थन देणे हे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.