03 March 2021

News Flash

‘वाघोबा’बीएनपी पारिबाच्या कळपात

दीड दशकापूर्वी अस्तित्वात आलेल्या व देशातील तिसऱ्या क्रमांकाची दलाल पेढी बनलेल्या शेअरखानवर फ्रान्सच्या बीएनपी पारिबासने ताबा मिळविला आहे.

| July 31, 2015 02:00 am

दीड दशकापूर्वी अस्तित्वात आलेल्या व देशातील तिसऱ्या क्रमांकाची दलाल पेढी बनलेल्या शेअरखानवर फ्रान्सच्या बीएनपी पारिबासने ताबा मिळविला आहे. हा व्यवहार २००० कोटी रुपयांचा झाला असण्याची शक्यता आहे.
भारतीय भांडवली बाजारात सल्लागाराच्या भूमिकेचा विस्तार करताना बीएनपी पारिबासने शेअरखानचे सर्व, १०० टक्के भागभांडवल खरेदी केले आहे. बीएनपी पारिबासचे युरोपात १७ लाख ग्राहक आहेत.
बीएनपी पारिबासमध्ये विलीन झाल्यानंतर शेअरखान ही यंत्रणा भारतातील व्यवसाय म्हणून स्वतंत्रपणे कार्यरत असेल; समभाग तसेच म्युच्युअल फंड, अन्य बचत योजनांची विक्री शेअरखानमार्फत कायम असेल, असे बीएनपी पारिबासच्या भारतातील व्यवसायाचे प्रमुख जोरिस डिरक्स यांनी म्हटले आहे. शेअरखानवरील वर्चस्व आम्हाला भारतातील व्यवसाय अधिक वृद्धिंगत करण्यास पूरक ठरेल, असेही डिरक्स म्हणाले.
२००० च्या दशकात देशातील पहिली स्वतंत्र दलाल पेढी म्हणून अस्तित्वात आलेल्या शेअरखानचा खाते राखण्यातील ७ टक्के हिस्सा आहे. गेल्या एक तपापासून ही पेढी नफ्यात राहिली आहे. तर बीएनपी पारिबासचे ७५ देशांमध्ये अस्तित्व असून तिच्याअंतर्गत १.८५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
एसएसकेआय इन्व्हेस्टर सव्‍‌र्हिसेसच्या नावाने म्हणून शेअरखान १९९५ मध्ये कार्यरत होती. त्यानंतर शेअरखान नावांतर्गत प्रवर्तक मोरखिया बंधूंनी एचएसबीसी प्रायव्हेट इक्विटी, इंटेल पॅसिफिक व कार्लेलमार्फत निधी उभारणी केली. २००६ मध्ये शेअरखानमध्ये जीए ग्लोबल इन्व्हेस्टमेन्टनेही रस घेतला. २००७ च्या सुमारास शेअरखानमधील ७५ टक्क्य़ांवरील हिस्सेदारी सामरा कॅपिटल व आयडीएफसी लिमिटेडने मिळविली. २००८ मध्ये मॉरिशसस्थित बॅरिंग प्रायव्हेट इक्विटीने १२ टक्के हिस्सा शेअरखानमध्ये मिळविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 2:00 am

Web Title: bnp paribas to buy sharekhan
Next Stories
1 इंडोको रेमेडिजची १२५ कोटींची गुंतवणूक
2 जनरल मोटर्सचा राज्याशी करार
3 डीएनएस बँकेला यंदाही ‘अ’ वर्ग
Just Now!
X