तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

ज्या गुंतवणूकदारांची समभाग गुंतवणूकधारणा दीर्घकालीन असते त्यांच्या दृष्टीने कंपनीच्या त्रमासिक निकालांना अनन्यसाधारण महत्त्व असते. ते जेव्हा जाहीर होतात त्यानंतर समभागाच्या किमतीत तीव्र स्वरूपाचे चढ-उतार होतात. त्यावर उपाय म्हणून ‘कल निर्धारण पातळी’ (ट्रेंड डिसायडर लेव्हल) या संकल्पनेचा आधार घेऊन निकाल जाहीर झाल्यावर समभागाची किंमत कल निर्धारण पातळीवर येणाऱ्या दिवसांत टिकून राहत असेल तर निकाल समाधानकारक असून दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक कायम राखावी अथवा सुरू ठेवावी. भविष्यात याचा उपयोग मार्गदर्शक तत्त्वासारखा होईल. तसेच अल्प व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी जे फ्युचर्स व कॉल, पुटमध्ये काम करतात व प्रत्येक लॉटमागे १० ते १५ रुपये कमावणे एवढीच माफक अपेक्षा असते त्यांनादेखील खालील कोष्टकाचा फायदा होताना दिसेल.

untitled-13

  • समभाग जेव्हा सामान्य मार्गक्रमण स्तरावर असतो (बॅण्ड) तेव्हा तो गुंतवणूकदारांनी आल्या स्मृतीपटलावर / रडारवर ठेवावा. यात टिटागर वॅगन, जयश्री टी, एम्.एम्.टी.सी., एन्.एम्.डी.सी., हदुजा व्हेंचर व केसीपी इ. येतात. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे ठीकच आहेत, पण अल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी जेव्हा उलाढालीचा (व्हॉल्युमच) पाठबळ मिळते (अप ब्रेक आऊट) तेव्हाच खरेदी करावा. म्हणजे जलद गतीने आकर्षक परतावा मिळतो यासाठी दोन उदाहरण पुरेशी आहेत.
  • ११ मार्चला शिफारस केलेला बॉम्बे डाइंग रु. ५९ सकारात्मक वरचा छेद (कल निर्धारण पातळी) रु. ६२ वर अप ब्रेक आऊट/ उलाढालीचा (व्हॉल्युमच) पाठबळ मिळून २८ मार्चला रु. ९० इच्छित उद्दिष्ट गाठेल.
  • महिंद्र लाइफ स्पेस १८ मार्चला रु. ३७९ ला शिफारस केला. रु. ३८० सकारात्मक वरचा छेद मिळाल्यावर इच्छित उद्दिष्ट ४३६ रुपये २८ मार्चला साध्य झाला.

वरील तांत्रिक विश्लेषणाचे तंत्र मंत्र वाचकांना भविष्यात देखील उपयोगी पडतील ही अपेक्षा.