२०२० पर्यंत २५० कोटींची गुंतवणूक; ५०० दालने सुरू करणार

मुंबई : सीजी कॉर्प ग्लोबल या भारतातील एक अग्रगण्य कंपनीने विस्तार योजनेतंर्गत ३० वाय वाय सिटी नुडल बार दालनांचा शुभारंभ केला आहे. २०२० पर्यंत आणखी ५०० दालने सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनी याकरिता २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

सीजी कॉर्पने यापूर्वीच आपल्या भारत बाजार विस्ताराकरिता ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून या योजनेतंर्गत २०२० पर्यंत २५० कोटी गुंतवण्याचा प्रस्ताव आहे. २०२५ पर्यंत वाय वाय सिटी बाजाराचे आकारमान १,००० कोटीपर्यंत नेण्याचे नियोजन असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सीजी ग्रुपचे अध्यक्ष बिनोद चौधरी यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांंपासून सीजी ग्रुपने ग्राहकांना परवडेल आणि या श्रेणीसोबत गुंतवल्या जातील अशा संधी पाहिल्या आणि शोधण्याचा प्रय केला. भारतात इंस्टंट नुडल्सची एक श्रेणी असून त्याचा पर दरडोडई क्रयशक्ती आधार अतिशय अल्प आहे. आम्ही जाणतो की, जोपर्यंत ग्राहक विविध प्रकारांतील नुडल्सचा अनुभव घेत नाही, त्यांना सेवनाची नवीन कारणे सापडत नाहीत, तोवर ही श्रेणी आम्ही कार्यान्वित असलेल्या इतर बाजारांच्या तुलनेत भारतात अल्प स्वरुपाची राहील. वाय वाय सिटी हा वाय वाय नुडल नाममुद्रेचे विस्तारित आहे; वाय वाय सिटीने नुडल क्रयशक्ती प्रसार वाढविला आहे. चविष्ट आणि दर्जेदार आहार देण्याशिवाय ही दालने ग्राहकांना नियमित पाककृतींच्या पलीकडे जाऊन नुडल अनुभव देण्याकरिता मदतीची ठरतील, असेही ते म्हणाले.

वाय वाय सिटी ही भारताची पहिली क्यूएसआर नुडल बार संकल्पना आहे. जलद सेवा पुरवणे हा या दालनांचा उद्देश असून रेस्टोरन्ट परिसरात रंगीत ग्राफिक्सच्या माध्यमातून आनंदासोबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही, असेही सांगण्यात आले.

रोमांचक, ताज्या आणि कल्पक पाककृतींचा आनंद घेण्यासोबत ग्रेट मिक्स ऑफ स्टार्टर डिलाईटस आणि मेन ऑफर्स यापूर्वी कधीही घेतला नसेल असा अनुभव देतील. या पाककृती आमच्या शेफ्सच्या टीमने तयार केल्या असून आम्हाला त्यांचे पेटंट घ्यायचे आहे,  असे शेफ शांती चौहान यांनी सांगितले.

आम्ही मास्टर फ्रेंचायजी आणि सब फ्रेंचायजी मार्गाने विकसित होऊ. आम्ही भारतात २५ मास्टर फ्रेंचायजी सुरू केल्या असून त्या त्यांच्या स्वत:च्या आऊटलेट्स आणि सब—फ्रेंचायजीमधून आपापल्या प्रदेशात कार्यान्वित राहतील. त्यामुळे आम्हाला विस्तार वाढविण्यास मोठी मदत मिळेल; तसेच दालन हे गाईडलाईन्स आणि मानकांनुसार सुरू आहे याची खातरजमा राहील. मास्टर फ्रेंचायजी आपल्या प्रदेशात ब्रँडचे प्रतिनिधित्व करेल आणि दालनाचे परिचलन नियंत्रित करेल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.