केंद्र सरकार कृषी पिकांसाठी पुढील महिन्यात नवीन स्वरूपात पीक विमा योजना लागू करणार आहे, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदरिया यांनी येथे सांगितले.
ते म्हणाले की, कृषी मंत्रालयाने शेतकरी संघटना, कृषी तज्ज्ञ व संबंधितांशी कृषी विमा योजनेच्या आराखडय़ावर चर्चा केली आहे. ही योजना एप्रिलच्या अखेरीस जाहीर केली जाईल.
कुंदरिया हे अजमेर येथे अवकाळी पाऊसग्रस्त भागाला भेट देण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी सरकारचा संपूर्ण पाठिंबा शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिल असे आश्वासन दिले.
ते म्हणाले की, राज्यातील पिकांच्या हानीची पाहणी करण्यासाठी केंद्राने पथक पाठवले आहे. ज्या शेतक ऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई दिली जाईल. शेतक ऱ्यांचे काय नुकसान झाले आहे याची पंतप्रधानांना कल्पना आहे, पावसामुळे शेतीचे राजस्थान, हरयाणा व पंजाबमध्ये नुकसान झाल्याच्या बातम्या आहेत असे ते म्हणाले. राजस्थानचे कृषी मंत्री प्रभूलाल सैनी, गृहमंत्री गुलाबचंद कटारिया या वेळी उपस्थित होते. अजमेरमधील विजयनगर भागाला या वेळी शिष्टमंडळाने भेट दिली.