News Flash

‘प्रसिद्ध’नाममुद्रा!

ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील ही ‘मिडकॅप’ धाटणीची देशातील एक सुप्रसिद्ध कंपनी असून गेली ३० वर्षे कार्यान्वित आहे. कोलकाता, गुवाहाटी आणि पाँडिचेरी

| August 12, 2013 12:22 pm

ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील ही ‘मिडकॅप’ धाटणीची देशातील एक सुप्रसिद्ध कंपनी असून गेली ३० वर्षे कार्यान्वित आहे. कोलकाता, गुवाहाटी आणि पाँडिचेरी येथून कंपनी आपली आयुर्वेदिक, त्वचेची निगा, टाल्कम पावडर, तेल आदी उत्पादने घेते. काही वर्षांपूर्वी इमामीने ‘झंडू फार्मास्युटिकल्स’  ताब्यात घेऊन आपले उत्पादन-भांडार विस्तारित केले. सध्या कंपनीकडे बोरोप्लस, नवरत्न तेल, सोना-चांदी च्यवनप्राश, फेअर अ‍ॅण्ड हँडसम आणि अर्थात झंडूचे सर्व  ब्रॅण्ड्स आहेत. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही कंपनीच्या उत्पादनांना चांगली मागणी असून अनेक देशांत कंपनी आपली उत्पादने निर्यातही करते. गेले दशकभर कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी केली असून, नुकतेच जाहीर झालेले निकालही अपेक्षेनुसार आहेत. जून २०१३ साठी कंपनीने गत वर्षांच्या तुलनेत उलाढालीत १३% वाढ साध्य करून ती ३८४ कोटींवर गेली आहे. तर नक्त नफ्यात ३०% वाढ साध्य करून तो ६१ कोटी रुपयांवर नेला आहे. मे महिन्यात ५३० रुपयांवर असलेला हा समभाग सध्या ४५० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. हप्त्याहप्त्याने खरेदी करण्याजोगी हा समभाग असून येत्या वर्षभरात तो २०% परतावा देऊ शकेल.
मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी इमामी पोर्टफोलियोचात जरूर असायला हवा.

इमामी लिमिटेड
सद्य बाजारभाव     रु. ४५२.६०
प्रमुख व्यवसाय    ग्राहकोपयोगी उत्पादने
भरणा झालेले भाग भांडवल     रु. २२.७ कोटी
पुस्तकी मूल्य      रु.  ३४.२    
दर्शनी मूल्य      रु. १
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)    रु. १४.८२
किंमत उत्पन्न गुणोत्तर  (पी/ई)    ३०.६ पट
बाजार भांडवल :   रु. १०,२७४ कोटी    बीटा : ०.५
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक:  रु. ५३९/ रु. ३१२

शेअरहोल्डिंग पॅटर्न (%)
 
प्रवर्तक    ७२.७४
परदेशी गुंतवणूकदार    १५.४६    
बँका / म्युच्युअल फंड्स    ३.२७
सामान्यजन  व इतर    ८.५३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 12:22 pm

Web Title: favourite portfolio midcap working in ayurveda since 30 years
Next Stories
1 अशी ‘नालस्ती’ कायद्याच्या विरुद्धच! बँकांच्या कर्जदार, हमीदारांची जाहीर अप्रतिष्ठा
2 गुंतवणुकीचे अल्पावधीत मापनदेखील धोक्याचेच!
3 एनएसईएल प्रकरणाचे गुंतवणूकदारांना धडे!
Just Now!
X