News Flash

‘बाजाराच्या चढय़ा मूल्यांकनांत ‘फ्लेक्झी कॅप’ सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय’

फ्लेक्झी कॅपमध्ये लार्ज कॅपपासून मिडकॅप आणि स्मॉल कॅप अशा तिन्ही प्रकारच्या समभागांचे मिश्रण असते.

मुंबई : भांडवली बाजार सध्या विक्रमी पातळीवर आहे. अर्थचक्र हळूहळू वेग घेत असले तरी सध्याचे भांडवली बाजाराचे मूल्यांकन हे मार्च २०२०च्या तुलनेत प्रचंड वाढले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात गुंतवणुकीचा विचार करीत असलेल्या परंतु बाजाराच्या चढे मूल्यांकन पाहता साशंक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी, फ्लेक्झी कॅप हा एक सर्वोत्तम पर्याय ठरेल, असे मत आयसीआयसीआय प्रूडेन्शिअल म्युच्युअल फंडाचे वरिष्ठ फंड व्यवस्थापक रजत चांडक यांनी व्यक्त केले.

फ्लेक्झी कॅपमध्ये लार्ज कॅपपासून मिडकॅप आणि स्मॉल कॅप अशा तिन्ही प्रकारच्या समभागांचे मिश्रण असते. त्याचबरोबर ‘सेबी’च्या वर्गीकरणानुसार ही अधिक लवचीक समभागसंलग्न फंडांची श्रेणी आहे. या श्रेणीत नुकतीच आयसीआयसीआय प्रूडेन्शिअलने एका योजना सादर केली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.

चांडक यांच्या मते, इक्विटी म्युच्युअल फंडाच्या श्रेणीत फ्लेक्झी कॅप सर्वात आकर्षक योजना आहे. या योजनेत वेगवेगळ्या बाजार मूल्यांकनानुसार गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. पोर्टफोलिओत लार्ज कॅपमधील गुंतवणूक संकटाच्या काळात सुरक्षा प्रदान करते, तर मिड आणि स्मॉल कॅपमधील गुंतवणूक दीर्घकाळात चांगला परतावा देण्यास फायदेशीर ठरतात. अनुकूल लाभ-जोखीम संतुलन हवे असलेल्या गुंतवणूकदारांना हा फंड प्रकार गुंतवणुकीचा चांगला मिळवून देतो.

आयसीआयसीआय प्रूडेन्शिअल फ्लेक्झी कॅप फंड गुंतवणूकदारांसाठी २८ जून २०२१ रोजी खुला झाला असून १२ जुलै २०२१ पर्यंत त्यात गुंतवणूक करता येणार आहे.

यामध्ये किमान ५००० रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. आयसीआयसीआय फ्लेक्झी कॅप फंडासाठी मिड आणि स्मॉल कॅप समभागांची निवड ही इन हाऊस मार्केट मॉडेलच्या आधारे केली जाते. त्याचबरोबर पोर्टफोलिओचे संतुलन राखण्यासाठी घराण्यांचे फंड व्यवस्थापक ‘बिझनेस सायकल’ आणि सूक्ष्म आर्थिक घटकांवर विचार करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:45 am

Web Title: flexi cap best investment option in rising market valuations ssh 93
Next Stories
1 सेन्सेक्स, निफ्टी सप्ताहअखेर स्थिर
2 सेन्सेक्स, निफ्टीचे नवीन शिखर
3 केंद्राकडून उसनवारीतून राज्यांना  ‘जीएसटी’ची महसुली भरपाई
Just Now!
X