News Flash

अभ्युदय बँकेची मुख्यमंत्री दुष्काळ निधीस मदत

सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून राष्ट्रीयीकृत बँका महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणास हातभार म्हणून सरकारच्या मदतीसाठी पुढे आल्या असताना, सहकार क्षेत्रातील अग्रेसर अभ्युदय बँकेने त्या दिशेने एक पाऊल

| April 3, 2013 02:34 am

सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून राष्ट्रीयीकृत बँका महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणास हातभार म्हणून सरकारच्या मदतीसाठी पुढे आल्या असताना, सहकार क्षेत्रातील अग्रेसर अभ्युदय बँकेने त्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अभ्युदय बँकेने मुंख्यमंत्री दुष्काळ निवारण निधीसाठी १ कोटी रुपयांची भरीव देणगी दिली आहे. अभ्युदय बँकेचे अध्यक्ष आमदार सीताराम घनदाट यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची अलीकडेच मंत्रालयात भेट घेऊन हा देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत उपाध्यक्ष नित्यानंद प्रभू, व्यवस्थापकीय संचालक विजय मोर्ये, मुख्य महाव्यवस्थापक राजीव गांगल व अन्य संचालक उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:34 am

Web Title: help from abhyudaya bank to cm drought fund
Next Stories
1 ‘पेटंट लढय़ा’त नोव्हार्टिस तोंडघशी!
2 राष्ट्रीय शेअर बाजार प्रमुखपदी चित्रा रामकृष्णन
3 ‘बीईंग ह्यूमन’ स्त्रियांच्या वस्त्रप्रावरणात!
Just Now!
X