परवडणाऱ्या घरनिर्मितीची बाजारपेठ ३० टक्क्यांनी वाढणार..

घर हे अनेकांकरिता स्वप्न असते ते अनेकदा दीर्घकालीन मासिक हप्त्याच्या दबावाने बिघडते. असा आघात हा मासिक उत्पन्नाकरिता मोठा असतो. परवडणाऱ्या घरांच्या वाढत्या मागणीचा कल, पहिल्यांदाच मालमत्ता खरेदी करणाऱ्यांचे सरासरी वय हे २० च्या आसपास असते. कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या खरेदीदारांसाठी असलेली आकर्षक अनुदान योजना यांमुळे परवडणाऱ्या घरांसाठी लागणाऱ्या गृहकर्जाची बाजारपेठ ही येत्या काही वर्षांमध्ये ३०% दराने वाढेल अशी अपेक्षा आहे.

तरीदेखील लोक घरांची खरेदी करण्याचे सुरूवातीच्या काळात ठरवत असल्याने, सर्वसाधारण उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बघता रोख रक्कमेच्या कमतरतेने गुरफटले जाण्याची वेळ येते. याचा अर्थ असा की जर योग्य पद्धतीने खर्चाचे नियोजन केले नाही तर प्रत्येक वर्षांला वाढत जाणाऱ्या खर्चाला तोंड देताना अनेकदा अतिशय कमी प्रमाणात बचत शिल्लक राहते. पुढील काही मार्ग कर्जासाठीच्या मासिक हप्त्याच्या खर्चामध्ये बचत करू शकतात –

बोनसचा उपयोग करणे :

अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांकरिता वार्षिक बोनस देतात. हा बोनस आकस्मिक खरेदी किंवा परदेशी सुटी घालविणे या कारणांनी खर्च होतो. त्याचे रुपांतर प्रत्येक वर्षांला अधिक मासिक हप्ता भरण्यासाठी किंवा अग्रिम देय देण्यासाठी वापरला जाऊ शकतो. जेव्हा कर्जाची रक्कम ही आधी देण्यास सुरूवात होते तेव्हा कर्जाच्या परतफेडीचा कालावधी कमी होतो, व्याजाची किंमत कमी होते आणि त्याचा परिणाम कमी मासिक हप्त्यामध्ये होतो. अतिरिक्त मासिक हप्त्यासाठी सुरुवातीला अधिक बचत करणे थोडय़ा प्रमाणात अवघड जात असले तरीदेखील तो दीर्घकाळाच्या दृष्टीने एक शहाणपणाचा निर्णय ठरतो. सर्व गृह वित्तपुरवठा कंपन्या/बँका यांच्याकडे सर्व तरत्या (फ्लोटिंग) दरांच्या मुदतीचे कर्ज जे व्यक्तिगत कर्जदारांच्या कर्जासाठी ‘शून्य’ पूर्वदेय आकार असतो. मासिक हप्ता वेळेवर देय केल्याने भविष्यासाठी पतपात्रता (कर्ज) देखील वाढते.

कर्ज अन्यकडे हस्तांतरीत करा :

कर्जावर अधिक चांगल्या सवलती देऊ करणारा गृह कर्जदाता असल्यास ऋणको बदलणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. याला शिलकीचे हस्तांतरण असेही म्हटले जाते आणि ते बहुतांश गृह कर्ज प्रदात्यांकडे उपलब्ध असते. शिल्लक हस्तांतरित करण्यामुळे कमी मासिक हप्त्याचा लाभ होऊ शकतो. यामध्ये अधिक चांगली सेवा आणि कर्जाच्या अटीची खात्रीदेखील होऊ शकते. अशा घटनांमध्ये, कर्जाला हस्तांतरीत करण्यासाठी येणाऱ्या खर्चाला ज्यामध्ये शुल्लक, गहाणखतावरील मु्द्रांक शुल्क यांचा समावेश असतो;  ते नव्या ऋणकोसह करणाऱ्या बचतीपेक्षा जास्त नसते. हा एक चांगला सौदा ठरल्यास मासिक हप्त्याच्या खर्चावर बचत करता येते.

दीर्घकालीन कालावधी निवडा :

गृह कर्जाचा मासिक हप्ता देय केल्यानंतर वास्तवामध्ये अनेकदा शिल्लक काहीच उरत नाही. मासिक हप्ता हा वेतानातून महिन्याच्या सुरूवातीला वजा केला जातो आणि त्यामुळे पुढील ३० दिवसांसाठी आव्हानाचे वाटू शकतात. वाढत्या महागाईच्या स्थितीत कमी होणारी पगारामधील वाढ ही जीवनशैलीच्या गरजा आणि किंमत वाढवतात.  त्यामुळे अतिशय आव्हानात्मक अशा घराच्या अंदाजपत्रकाला चालविणे जवळपास अशक्य होते. यामुळेच मासिक हप्ता कमी करणे हे कर्जाच्या कालावधीला वाढविणे हे एक योग्य पाऊल ठरते. कारण हेच केवळ कर्ज घेणाऱ्याला आवश्यक असलेले आर्थिक नियोजनाला वाव देऊ करते.

उदाहरणासाठी – रु. ६० लाखाच्या ९% व्याजदराने २० वर्षे कालावधीच्या गृह कर्जासाठी मासिक हप्ता रु. ५३,९८४ होतो. हाच कालावधी ३० वर्षे गृहित धरल्यास ६० लाख रुपयांकरिता मासिक हप्ता रु. ४८,२७७ असू शकतो. हा पर्याय काही वर्षांसाठी स्वीकारण्यास हरकरत नाही. यामुळे भविष्यामध्ये जेव्हा वेतन वाढेल तेव्हा कर्जाचा कालावधी कमी करू शकाल आणि मोठय़ा रकमेचा मासिक हप्ता देय करता येईल.

नियमित अंतराने परतफेड :

अनेकदा, मासिक हप्त्यात खंड पडला तर विसरलेल्या वारसा हक्काने येणारी संपत्तीचा अप्रत्यक्ष लाभ होऊ शकतो. ही एकरक्कमी रक्कम ही पूर्वजांच्या मालमत्तेमधील हिश्श्याच्या स्वरूपात, जीवन विमा योजनेमधील मनी बॅकची रक्कम किंवा अन्य कोणत्याही स्रोतच्या रुपात असते. अशा प्रकारे प्राप्त होणारी रक्कम ही नियमित अंतराने एक रक्कमी परतफेड करण्यासाठी स्मार्टपणे वापरली जाऊ शकते. फक्त एक लाख रुपये ३ वर्षांनी परतफेड करून १.८८ लाखांची बचत करता येते. कर्जाच्या कालावधीमध्ये ५० लाख रुपयांच्या गृहकर्जामध्ये ६ महिन्याच्या कालावधीला कमी करता येते. ते मूलत: ९% तरत्या व्याज दराने १५ वर्षांच्या कालावधीसाठी सुरू होते. ही एक रकमी परतफेड कमी करू शकल्यास वास्तविकरित्या परतफेडीच्या कालावधीला किंवा मासिक हप्त्याला मोठय़ा फरकाने कमी करता येते. गृहकर्जाच्या आरंभीच्या वर्षांमध्ये कर्जाच्या परतफेडीला एक रकमी भरणा करून अधिकाधिक लाभ घेता आला पाहिजे.

(लेखक रिलायन्स होम फायनान्सचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)