एलआयसी हाऊसिंग फायनान्सकडून ६.६६ टक्के भेट

नवी दिल्ली : करोना साथ प्रसार, टाळेबंदीचे निर्बंध या दरम्यान ग्राहकांकडून कर्जासाठीची मागणी कमी झाली असतानाच गृह कर्जाचे व्याजदर किमान पातळीवर ठेपले आहेत.

आघाडीच्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीने सर्वात कमी, वार्षिक ६.६६ टक्के किमान गृह कर्ज व्याजदर ३० वर्षांपर्यंत देऊ केला आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्सने ५० लाख रुपयेपर्यंतच्या गृह कर्जासाठी ६.६६ टक्के व्याजदर उपलब्ध करून दिला असून ही योजना ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सवलतीच्या व्याजदरामुळे कर्जदारांची मागणी वाढेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

किमान गृह कर्ज व्याजदर :

६.६५ टक्के       कोटक महिंद्र बँक

६.७५ टक्के       सिटी बँक

६.८० टक्के       यूनियन बँक

६.८५ टक्के       बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक

६.७० टक्के       स्टेट बँक

६.७५ टक्के       एचडीएफसी लिमिटेड

६.९० टक्के       आयसीआयसीआय बँक