वित्तसंस्थांचा इशारा

मुंबई : देशातील वाढत्या करोना साथ आणि निर्बंधाच्या अर्थव्यवस्थेवरील विपरित परिणामांची भीती व्यक्त करत आघाडीच्या पतमानांकन, वित्तसंस्थांनी भारतातील आरोग्य तसेच आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

फिच रेटिंग्जने देशातील लसीकरणाच्या मोहिमेबद्दल नाराजी व्यक्त केली असून ही प्रक्रिया अत्यंत संथ होत असल्याचे म्हटले आहे. परिणामी हा देश आरोग्याबाबत असुरक्षित स्थितीत असल्याचे नमूद केले आहे. देशात करोना साथीची आणखी एक लाट येण्याबाबतची शंकाही उपस्थित करण्यात आली आहे. ५ मेअखेर देशात एकूण लोकसंख्येच्या केवळ ९.४ टक्के लसीकरण झाल्याचाही हवाला देण्यात आला आहे. देशातील अर्थहालचाल एप्रिल २०२० मध्ये झालीच नाही, असे स्पष्ट करत वर्ष २०२० तुलनेत मेमध्ये काही प्रमाणात वाढीव व्यवहार होत असल्याचे म्हटले आहे. करोना साथप्रसार हे बँकासाठी अर्थस्थिती चिंताजनक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली.