News Flash

बाजार: रुपया सप्ताह नीचांकीतून बाहेर

सुरुवातीचे नुकसान भरून काढतानाच मंगळवारच्या तुलनेत एक पैशाने वधारलेल्या रुपयाने बुधवारी सप्ताह तळातून बाहेर येण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

| June 26, 2014 01:36 am

सुरुवातीचे नुकसान भरून काढतानाच मंगळवारच्या तुलनेत एक पैशाने वधारलेल्या रुपयाने बुधवारी सप्ताह तळातून बाहेर येण्याचा यशस्वी प्रयत्न केला. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन ६०.१३ वर स्थिरावले. ६०.२३ या किमान स्तरावर दिवसाचा प्रवास सुरू करणारा रुपया दिवसअखेर चलन व्यवहारातील उच्चांकी स्थितीवर स्थिरावला. रुपयाचा ६०.३८ हा सप्ताह नीचांक राहिला आहे.
सोने-चांदी दर सुखावले
सराफा बाजारात बुधवारी मौल्यवान धातूंचे दर काही प्रमाणात खाली आले. शहरात स्टॅण्डर्ड सोने तोळ्यामागे १९५ रुपयांनी कमी होत २८,१५५ रुपयापर्यंत घसरले. तर चांदीचा दरदेखील बुधवारी एकदम किलोसाठी ४९० रुपयांनी खाली येत त्याला ४५ हजारांपर्यंतचा भाव मिळाला. चांदीचा दर गेल्या काही दिवसांत कमालीचा उंचावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2014 1:36 am

Web Title: indian rupee down 19 paise against us dollar
टॅग : Us Dollar
Next Stories
1 बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांना वाणिज्य बँकांचे ‘व्यवसाय प्रतिनिधी’ होता येईल : रिझव्‍‌र्ह बँक
2 ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन!
3 ‘अलइटालिया’ला एतिहाद तारणार!
Just Now!
X