* कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण उलट वाढलेला आहे. टाळेबंदीच्या सुरुवातीला बाजार ही अत्यावश्यक सेवा आहे यावर कायदा सुव्यवस्था राखणाऱ्यांचा विश्वास नव्हता. आम्ही किमान कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते त्यांनाच बोलावले. टाळेबंदी सुरू झाल्यानंतर एक-दोन दिवसांत आम्ही नव्या वातावरणात रुळलो. पहिल्या आठवडय़ातच आम्ही कार्यालयीन कामकाजासाठी एक वेळापत्रक बनवले आहे. रोज सकाळी संघनायक त्यांच्या संघ सदस्यांशी संवाद साधतात. नंतर आम्ही वरिष्ठ अधिकारी ‘झूम अ‍ॅप’वर एकत्र येऊन एकूण कार्यालयीन कामाचा आढावा घेतो. आम्ही चित्र संवादासाठी ‘झूम’ तर कार्यालयीन डेटाच्या देवाणघेवाणीसाठी ‘स्लॅक’ या अ‍ॅपचा वापर करतो. नियमितपणे होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या या बैठकीला आम्ही गमतीने ‘झूम पर चाय चर्चा’ असे म्हणतो.

या टाळेबंदीने कार्यपद्धतीत लवचीकता आणली. परदेशात लोकप्रिय झालेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यसंस्कृतीला भारतात काही जणांचा विरोध होता. बदललेल्या परिस्थितीने भारतातही कार्यसंस्कृती रुजवली. करोना कहर ओसंडल्यावर सर्वसाधारण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यसंस्कृती इथे नुसतीच रुजणार नाही तर फोफावेल. ‘वर्क फ्रॉम होम’सारखी आनंददायी दुसरी कोणती गोष्ट नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून कार्यालयीन जबाबदाऱ्या लवचीकतेने पार पाडता येऊ शकतात.  घोषित टाळेबंदी उठल्यानंतर आम्ही कर्मचाऱ्यांना लगेच दुसऱ्या दिवसापासून रुजू करून घेणार नाही. सर्व कर्मचारी पूर्ण संख्येने रुजू होण्यास मेअखेर होईल, असे वाटते.

सल्ला

* बाजाराचे मूल्यांकन आकर्षक वाटले तरी जितकी रक्कम पुढील पाच वर्षे लागणार नाही तितकीच रक्कम भांडवली बाजारात गुंतवा. नजीकच्या काळात पुरेशी रोकडसुलभता राहील याची काळजी घ्या. अनेक जण कर्ज काढून पैसे गुंतवू का, असे प्रश्न विचारतात. कर्ज काढून गुंतवणूक करण्याची ही जागा नाही. बाजारात कधी काय होईल याचा नेम नसल्याने मूल्यांकन आकर्षक वाटले तरी गुंतवणूक विचारपूर्वकच करा.