‘मेमरी ड्राईव्ह’ निर्मिती क्षेत्रात अग्रस्थानी असणाऱया किंग्सटन या खासगी कंपनीने आपला नवा ‘लॉकर प्लस जी३’ नावाच्या ‘डेटा ट्रॅव्हेलर’चे (यूएसबी) इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स कंज्यूमर शो २०१४ (सीईएस) दरम्यान अनावरण केले.
 मेमरी ड्राईव्ह निर्मितीत हातखंडा असलेल्या ‘किंग्सस्टन’ने यावेळी हा हायटेक यूएसबी ड्राईव्ह ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. या यूएसबीला आपण पासवर्ड देऊन त्यातील माहितीची गुप्तता राखू शकतो. तसेच हा यूएसबी ‘वायसर प्रोटेक्टिव’ असल्याने कोणत्याही संगणकाला जोडल्याने ‘यूएसबी’त ‘वायरस’ जाऊन तो निकामी झाल्याची ग्राहकांची भिती दूर झाली आहे. हा यूएसबी ८, १६, ३२ आणि ६४ जीबी प्रकारात उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे किंग्सटन या लॉकर प्लस जी३ ला पाच वर्षांची ‘वॉरंटी’सुद्धा दिली आहे. या नव्या यूएसबीची सविस्तर माहिती किंग्सटनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.