मुंबई : लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेडने मुंबईत लवकरच सुरू केले जाणाऱ्या लेमन ट्री प्रीमिअर—मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या नव्या हॉटेलचा विशेष आढावा सादर केला. यानुसार, पुण्यानंतर मुंबई या दुसऱ्या शहरात लेमन ट्री प्रीमिअर सुरू होणार आहे. तर औरंगाबाद व पुणे यानंतर महाराष्ट्रातील या तिसऱ्या शहरात हा समूह कार्यरत असणार आहे.

या विस्तार योजनेनंतर लेमन ट्री ३४ शहरात ५७ हॉटेलांमध्ये ५,८०० खोल्या उपलब्ध करणार असून यामुळे ही भारतातील मध्यम-दराच्या हॉटेल क्षेत्रातील सर्वात मोठी हॉटेल साखळी ठरणार आहे, असे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पतंजली केसवानी यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.

अंधेरी (पूर्व) येथे हे अत्याधुनिक हॉटेल बिझनेस व लिजर ट्रॅव्हलर या दोन्हींवर भर देणार आहे. अंधेरी – कुर्ला मार्गावर असणारे हे हॉटेल सीप्झ, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आदींपासून नजीक आहे. आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत ५७ शहरात ८५ हॉटेलांमध्ये ८,६४७ खोल्यांचे कंपनीचे लक्ष्य आहे.