सहकार क्षेत्रातील आघाडीच्या एसव्हीसी बँकेच्या (द शामराव विठ्ठल सहकारी बँक लि.) व्यवस्थापकीय संचालकपदी सुहास सहकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील ३५ वर्षांचा अनुभव असलेल्या सहकारी यांनी १ ऑक्टोबर २०१५ पासून नव्या पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. सहकारी यांचे स्वागत करतानाच बँकेचे अध्यक्ष सुरेश हेम्माडी यांनी त्यांना नव्या कारकीर्दीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. १०९ वर्षांपासून असलेल्या सहकार क्षेत्रातील एसव्हीसी बँकेने २१,००० कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा टप्पा गाठला आहे. बँकेच्या विविध १० राज्यांमध्ये १८१ शाखा आहेत.