ग्रामविकासाच्या दृष्टीने येत्या चालू आर्थिक वर्षात महत्वाची पाऊले उचलली जाणार असून ग्रामीण भागात २४ तास वीजपुरवठ्यासाठी ‘दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना’ राबविण्यात येणार आहे. यासाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तर, देशातील मागावर्गीयांच्या विकासासाठी ५०,५४८ कोटींची तरतूद केली गेली आहे. यूपीए सरकारच्या काळातील मनरेगाही महत्वाकांक्षी योजना यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय यूपीए सरकारकडून घेण्यात आला असून योजनेची क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर ‘पंतप्रधान ग्राम सडक योजनेचीही क्षमता वाढविण्यात येणार असून यासाठी १४,३८९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण आवास योजनेसाठी ८ हजार कोटी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
सीमेलगतच्या गावांच्या विकासासाठीही ९९० कोटींच्या मदतीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.