29 September 2020

News Flash

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, जाणून घ्या नवे दर !

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने होतोय फायदा

संग्रहित छायाचित्र

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने भारतात आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होत आहे. रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल १२ पैशांनी तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले आहे.

शनिवारी केंद्र सरकारनं इंधनावरील उत्पादन शुल्कात प्रति लीटर तीन रूपयांनी वाढ केली होती. त्यानंतर कंपन्यांनी आता जनतेला काहीसा दिलासा दिला आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार पेट्रोलचा दर दिल्लीत ६९.७५ रुपये, मुंबईत ७५.४६ रुपये, कोलकाता येथे ७२.४५ रुपये आणि चेन्नई येथे ७२.४५ रुपये आहे. डिझेलचा भाव दिल्लीत ६२.४४ रुपये, मुंबईत ६५.३७ रुपये, कोलकाता येथे ६४.७७ रुपये आणि चेन्नई येथे ६५.८७ रुपये आहे. महाराष्ट्रात इंधनावरील व्हॅट वाढवण्यात आल्याने पेट्रोलचे भाव मुंबईतील इतर चार मेट्रो सिटींच्या तुलनेत सर्वाधिक आहेत.

कशामुळे दरांमध्ये घसरण?
रशिया विरोधात सौदी अरेबियाने दर युद्ध सुरु केले आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. त्याचा फायदा आता भारत सरकार आणि भारतातील सर्वसामान्य वाहनचालकांना होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 12:18 pm

Web Title: petrol diesel rates cut today petrol diesel latest prices pkd 81
टॅग Petrol Price
Next Stories
1 सीतारामन संतापल्या : SBI अध्यक्षांना म्हणाल्या… “तुम्ही निर्दयी, अकार्यक्षम आहात”
2 येस बँक बुधवारपासून निर्बंधमुक्त
3 खुशखबर : पुढील तीन दिवसात येस बँकेवरील निर्बंध हटणार
Just Now!
X