News Flash

‘फायझर’चा नवी मुंबईतील प्रकल्प अखेर बंद

ठाणे-बेलापूर पट्टय़ात गेल्या अर्धशतकापासून असलेला फायझर कंपनीचा औषधनिर्माण प्रकल्प अखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

| July 16, 2015 12:01 pm

ठाणे-बेलापूर पट्टय़ात गेल्या अर्धशतकापासून असलेला फायझर कंपनीचा औषधनिर्माण प्रकल्प अखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९६० च्या दशकात हा प्रकल्प अस्तित्वात आला होता.
या प्रकल्पात २०१३ पासूनच औषध उत्पादन बंद करण्यात आले होते. आता १६ सप्टेंबरपासून हा प्रकल्प पूर्णत: बंद असेल, असे कंपनीने बुधवारी मुंबई शेअर बाजाराला कळविले. कंपनीने येथील कामगारांना गेल्या वर्षीच स्वेच्छानिवृत्ती जारी केली. तेथील २१२ पैकी १३२ कामगारांनी याचा लाभ घेतल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. उर्वरित कामगारांना प्रकल्प बंद असला तरी पूर्ण वेतन मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2015 12:01 pm

Web Title: phyzer navi mumbai project finally closed
टॅग : Project
Next Stories
1 महिला संचालकपदाची नियुक्ती न करणाऱ्या ५३० कंपन्यांना दंड
2 निर्यात घसरण सलग सातव्या महिन्यांत..!
3 नॅनोवरील ‘स्वस्त’ शिक्का चुकीचा ठरला!
Just Now!
X