22 April 2019

News Flash

रतन टाटा यांची नवीन वैयक्तिक गुंतवणूक

अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली, कॅलिफोर्नियातील अब्रा ही कंपनी बिल बार्हिड याने २०१४ मध्ये स्थापन केली

रतन टाटा

नव उद्यमी (स्टार्ट अप) कंपन्यांमध्ये वैयक्तिक गुंतवणुकीचा धडाका लावणाऱ्या टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी अमेरिकास्थित अब्रा कंपनीत गुंतवणूक केली आहे. आभासी चलन कंपनीच्या माध्यमातून अमेरिकन एक्स्प्रेससह प्रथमच टाटा यांनी भागीदारीत गुंतवणूक केली आहे.

या गुंतवणुकीतील रक्कम स्पष्ट करण्यात आली नसली तरी या व्यवहारामार्फत अब्रा या कंपनीने ऑनलाइन तसेच डिजिटल रोकड आधारित वेतन देय प्रणालीत शिरकाव केला आहे. यासाठी अब्राचे नवे अ‍ॅप लवकरच अमेरिका तसेच फिलिपाइन्समध्ये उपलब्ध होणार आहे. स्मार्टफोनमार्फत निधी हस्तांतरणाकरिता याद्वारे डिजिटल रोकड व्यवहार होतील.

अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली, कॅलिफोर्नियातील अब्रा ही कंपनी बिल बार्हिड याने २०१४ मध्ये स्थापन केली. जागतिक अर्थव्यवस्थेत २००९च्या सुमारास बिटकॉइनच्या माध्यमातून सर्वप्रथम आभासी चलनाची पद्धती अस्तित्वात आली.
रतन टाटा यांनी गेल्या काही वर्षांमध्ये १४ कंपन्यांमध्ये वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. यामध्ये ओला, अर्बन लॅडर, स्नॅपडील, पेटीएम, कारदेखो, शिओमीसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

First Published on October 24, 2015 2:35 am

Web Title: ratan tata invests in us based virtual currency startup abra
टॅग Ratan Tata