News Flash

१० लाख कोटी रुपये : इन्कम टॅक्सचा झाला विक्रमी भरणा

२०१७-१८ या आर्थिक वर्षात प्राप्ती कराचा भरणा विक्रमी १०.०३ लाख कोटी रुपये इतका झाला आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

इन्कम टॅक्स किंवा प्राप्ती कराची वसुली गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी झाली असल्याचे वृत्त आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं (सीबीडीटी) दिलेल्या माहितीनुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्राप्ती कराचा भरणा विक्रमी १०.०३ लाख कोटी रुपये इतका झाला आहे.

शबरी भट्टसाली या सीबीडीटीच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार २०१७-१८ या वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न किंवा प्राप्ती कर विवरण पत्र भरण्याचा देखील उच्चांक झाला असून तब्बल ६.९२ कोटी करदात्यांनी कर विवरण पत्र भरले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या म्हणजे २०१६-१७ च्या ५.६१ कोटींच्या तुलनेत यंदा तब्बल १.३१ कोटी जास्त करदात्यांनी रिटर्न फाइल केल्याचे भट्टसाली म्हणाल्या. या वर्षीही कर विवरण पत्र भरणाऱ्यांची संख्या सव्वा कोटींनी वाढेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले, असे वृत्त पीटीआयनं दिलं आहे

ईशान्य भारताचे प्राप्ती कर खात्याचे मुख्य आयुक्त एलसी जोळी रानी यांच्या सांगण्यानुसार ईशान्तूय भारतातूनही सात हजार कोटी रुपयांचा प्राप्ती कर जमा झाला असून ही गेल्या वर्षीच्या तुलनेत १६.७ टक्क्यांची वाढ आहे. गेल्या वर्षी ईशान्य भारतातून सहा हजार कोटी रुपयांचा प्राप्ती कर जमा झाला होता.

तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात ईशान्य भारतातून ८,३५७ कोटी रुपयांच्या इन्कम टॅक्सच्या भरण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात आयकर सेवा केंद्रे उभारण्यात येत असून जास्तीत जास्त लोकांना करांच्या जाळ्यात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 8:25 am

Web Title: record rs 10 lakh crore income tax collection in 2017 18
Next Stories
1 जेट एअरवेज सात विमाने भाडय़ाने देणार
2 टाटा म्युच्युअल फंडाची ‘मल्टी कॅप फंड’ योजना
3 बीएनपी परिबा इंडिया कंझम्प्शन फंड खुला
Just Now!
X