मुंबईतील करोना रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स फाउंडेशनने (आरएफ) शहरातील कोविड-१९ प्रतिबंधनात्मक व्यवस्थापनाची गरज लक्षात घेत तसेच वैश्विाक साथीविरुद्ध लढणाऱ्या शासनाला साहाय्य करण्यासाठी तिचे या क्षेत्रातील कार्य अधिक वेगवान केले आहे.

यानुसार, एनएससीआय, सेव्हन हिल्स रुग्णालय आणि बीकेसी येथील द ट्रायडंट येथील अतिदक्षता विभागातील १४५ खाटांसह आता सर्व मिळून ८७५ खाटांचे व्यवस्थापन रिलायन्स फाउंडेशनमार्फत होणार आहे. तसेच एनएससीआय, सेव्हन हिल्समधील करोना रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या रिलायन्स फाउंडेशन आणि सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. कोविड प्रतिबंधेकरिता कोणत्याही सामाजिक संस्थेमार्फत होणारे हे मुंबईतील सर्वात मोठे योगदान मानले जाते.

महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेबरोबरचे सहकार्य अधिक वृंद्धिगत करताना रिलायन्स फाउंडेशनने मुंबईतील कोविडविरोधातील लढाईसाठी आणखी चार उपक्रम राबविले आहेत. यानुसार एनएससीआय येथे ६५० खाटांचे व्यवस्थापन केले जाणार आहे. नवीन अतिदक्षता विभागातील १०० खाटांची उपलब्धतता येत्या १५ मे २०२१ पासून प्रत्यक्षात अस्तित्वात येईल. सध्या कार्यरत ५५० खाटांच्या विभागाचे (वॉर्ड) येत्या १ मेपासून व्यवस्थापन व परिचलन संस्थेच्या रुग्णालयामार्फत केले जाईल. तसेच करोना रुग्णांसाठींच्या एकूण ६५० खाटांचे परिचलन व व्यवस्थापन होईल. रुग्णांसाठी अविरत वैद्यकीय व्यवस्थापन हाताळण्यासाठी डॉक्टर, परिचारिका तसेच अ-वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला ५०० जणांचा चमू उपलब्ध करून दिला जाणार आहे. अति दक्षता विभागातील खाटा तसेच कृत्रिम श्वासन यंत्रणा, विविध वैद्यकीय उपकरणे आदींचा एकूण प्रकल्प खर्च तसेच ६५० खाटांच्या परिचलनासाठी येणारा सर्व खर्च तसेच एनएससीआय आणि सेव्हन हिल्स रुग्णालयातील सर्व करोना रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा करण्यात आली आहे.

कोविड विरोधातील लढाईसाठी रिलायन्स फाउंडेशन मुंबईतील देवनार येथील स्पंदन हॅलिस्टिक मदर-अँड-चाइल्ड केअर हॅस्पिटलमध्ये नवीन कोविड प्रतिबंध सुविधा उभारणीसाठी सहकार्य करत आहे. सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईतील एचबीटी ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये विशेष असे १० खाटांचे डायलिसिस केंद्र उभारण्यात येत आहे.