सहारा समूहातील दोन मालमत्ता लिलावाच्या प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षरीत्या उपस्थिती दर्शविली.
सहारा समूहाच्या उत्तर भारतातील दोन मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. यावेळी अद्ययावत करण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान सुविधेची चाचपणी सर्वोच्च न्यायालयाने केली. न्या. टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सहाराची मालमत्ता लिलाव प्रक्रियाही यावेळी समजून घेतली.
समूहाच्या १४० एकर जागेसाठी दोन उत्सुक खरेदीदार सहभागी होत आहेत. समूहाच्या अखत्यारित गोरखपूरमधील ही जागा आहे. यासाठी समृद्धी डेव्हलपर्सने ११० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवत प्रक्रिया सुरू झाली. तर दुसरी कंपनी गोरखपूर रिअल इस्टेट डेव्हलपर्सने ११५ रुपयांची बोली यानंतर लावली. दिवसअखेपर्यंत ही प्रक्रिया कायम होती.
सहारा समूहप्रमुख सुब्रता रॉय यांच्या जामिनासाठी १०,००० कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. गुंतवणूकदारांची रक्कम परस्पर अन्य योजनांमध्ये वळती केली प्रकरणात कारवाई करणाऱ्या सेबीद्वारे समूहाकडून ३६,००० कोटी रुपये येणे असल्याचा दावा केला गेला आहे.