स्टेट बँकेने वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याजदर देऊ करतानाच ‘मार्जीनल कॉस्ट ऑफ फंड्स’ आधारित कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.

देशातील सर्वाधिक कर्जवाटप असलेल्या स्टेट बँकेने ‘मार्जीनल कॉस्ट ऑफ फंड्स’ आधारित कर्जाच्या व्याजदरात ०.१५ टक्कय़ाची कपात केली आहे. मागील काही दिवसात स्टेट बँक व्याजदरात सातत्याने कपात करीत असून ही १२वी कपात असल्याचे स्टेट बँकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याजाची ठेव योजना

सध्याच्या घसरत्या व्याजदरामुळे केवळ व्याजावर उदरनिर्वाह करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्टेट बँकेने ‘एसबीआय वुई केअर डिपॉझिट’ ही ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याज देणारी मुदत ठेव योजना सुरू केली असून या नवीन योजनेअंतर्गत ५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी असलेल्या मुदत ठेवींवर ०.३० टक्के अतिरिक्त व्याज ठेवीधारकांना देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.