18 October 2019

News Flash

सेन्सेक्स २५००० च्या खाली; गेल्या चार महिन्यांतील निच्चांकी पातळी

क्षेत्रीय पातळीवर मुंबई शेअर बाजारात सर्व क्षेत्रात घसरण झाली आहे

| January 7, 2016 02:55 pm

सलग दुसऱ्या दिवशी चीनी शेअर बाजारात झालेल्या पडझडीचे पडसाद भारतीय शेअर बाजारातही उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक गुरूवारी तब्बल ४०० अंकांनी कोसळून २५०००च्या पातळीच्या खाली जाऊन पोहचला. सेन्सेक्सची ही गेल्या चार महिन्यांतील निच्चांकी पातळी आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १२२ अंशांची घट झाली आहे. निफ्टी ७,६१८ पातळीवर पोचला आहे.
क्षेत्रीय पातळीवर मुंबई शेअर बाजारात सर्व क्षेत्रात घसरण झाली आहे. लुपिन, एसजेव्हीएन, एचपीसीएल आणि कजरिया सिरॅमिक यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत. तर टाटा मोटर्स, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत.

First Published on January 7, 2016 2:46 pm

Web Title: sensex cracks below 25000 mark after 4 months tumbles over 400 points
टॅग Nse,Share Market