भांडवली बाजार व्यवहारादरम्यानच व्याजदर कपातीची घोषणा करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाचे गुंतवणूकदारांनी मात्र कोणतेही स्वागत केले नाही. उलट प्रमुख निर्देशांकांनी सप्ताहअखेर घसरणीसह नोंदविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी २६०.३१ अंश घसरणीसह ३०,६७२.५९ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६७ अंश घसरणीने ९,०३९.२५ पर्यंत स्थिरावला.

आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रातील व्यवहाराची सुरुवात भांडवली बाजाराने तेजीसह केली होती. गुरुवारच्या तुलनेत सेन्सेक्स यावेळी ४५०हून अधिक अंशाने वाढला होता. मात्र दुपारच्या सत्रापूर्वी रिझव्‍‌र्ह बँके ने अचानक व्याजदर कपात केल्याचे जाहीर झाल्यानंतर त्याचे विपरीत पडसाद भांडवली बाजारावर उमटले.

दोन्ही प्रमुख निर्देशांकातील तेव्हापासूनची घसरण सत्रअखेपर्यंत कायम राहिली.

कर्जदारांना तीन मासिक हप्ते न भरण्याच्या रिझव्‍‌र्ह बँके च्या शिथिलतेने बँकांवरील थकीत कर्जाचा भार अधिक वाढण्याबाबतची चिंता बाजारात उमटली.