सलग दोन व्यवहारांतील मोठी निर्देशांक आपटी अखेर बुधवारी रोखली गेली. निवडक क्षेत्रातील समभागांच्या खरेदीमुळे सेन्सेक्स १८.६९ अंश वाढीने २८,३७२.२३ वर बंद झाला. तर ११ अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,७२६.६० पर्यंत स्थिरावला. ईदनिमित्त मंगळवारी भांडवली बाजारात व्यवहार झाले नाहीत. त्यापूर्वीच्या दोन व्यवहारात मुंबई निर्देशांक तब्बल ६९१.७४ अंशांनी कोसळला होता.

ऑगस्टमध्ये वाढलेल्या घाऊक किंमत निर्देशांकामुळे बाजारात फारशी खरेदीचे वातावरण नव्हते. परिणामी सेन्सेक्स दिवसअखेर किरकोळ वाढ नोंदवीत स्थिरावला. तर निफ्टीचा बुधवारचा प्रवास ८,७३९.८५ ते ८,६८८.९० दरम्यान राहिला. सेन्सेक्समधील ३० पैकी १७ समभाग तेजीच्या यादीत राहिले.