News Flash

कामगारांच्या ‘पीएफ’चा निधी पुढील महिन्यापासून भांडवली बाजारात

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) मधून भांडवली बाजारात गुंतवणूक पुढील महिन्यात खुली होणार असून एकूण निधीच्या पाच टक्के रक्कम चालू

| June 26, 2015 08:19 am

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) मधून भांडवली बाजारात गुंतवणूक पुढील महिन्यात खुली होणार असून एकूण निधीच्या पाच टक्के रक्कम चालू आर्थिक वर्षांत गुंतवली जाणार आहे. देशातील लाखो निवृत्ती वेतनधारकांच्या कोटय़वधीच्या रकमेचे निधी व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत ही ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक बाजारातील ‘ईटीएफ’ फंडांमध्ये होईल. ‘ईपीएफओ’ला चालू आर्थिक वर्षांत अतिरिक्त ठेवीच्या माध्यमातून १ लाख कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा असल्याने उद्दिष्टाची रक्कम बाजारात गुंतवणे शक्य होईल, असे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापक के. के. जालान यांनी सांगितले.
ईपीएफची रक्कम भांडवली बाजारात गुंतवण्याचा निर्णय केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मार्चमध्ये झाला. स कामगार संघटनांनी त्याला विरोध दर्शविला, तरी एप्रिलमध्ये केंद्रीय कामगार खात्याने ‘ईपीएफओ’ला ५ गुंतवणुकीसंबंधी आदेश जारी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2015 8:19 am

Web Title: workers pf funds in capital markets from next month
टॅग : Arthsatta,Pf
Next Stories
1 ‘केपीआयटी’ ढेपाळला: लाभांश गमावण्याची भीती अनाठायी; कंपनीचा खुलासा
2 अमेरिकेच्या ई-पेठेत भारतीय कंपनीचा दबदबा
3 ‘नियमाक चौकटीविना ‘ई-फार्मसी’ला परवानागी धोकादायक ठरेल’
Just Now!
X