सर्वात मोठय़ा डेटाविषयक व्यवसायासाठी ओखले जाणाऱ्या नवी मुंबईतील महापे भागात ईएसडीएसनेही नवा व्यवसाय थाटला आहे. कंपनीने यासाठी महाराष्ट्र शासनाबरोबर २०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला असून दोन वर्षांत ५०० रोजगार निर्मितीचे लक्ष्य राखले आहे.

ईएसडीएस (एक्झुबर्नट् सपोर्ट फॉर डेटा सव्‍‌र्हिसेस) च्या महापे येथील ८०,००० चौरस फूट जागेतील नव्या डेटा सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष सोमाणी यांनी सांगितले की हार्डवेअरच्या तुलनेत क्लाऊड तंत्रज्ञानाद्वारे डेटा सेंटरविषयक व्यवसायात ८० टक्क्य़ांपर्यंत बचत होत असून पाच वर्षांत हे क्षेत्र वेगाने विकास करेल. नव्या डेटा सेंटरच्या निमित्ताने ईएसडीएसच्या ईनाईट ३६० या उत्पादनाचे सादरीकरणही झाले. कंपनीचे मुंबईसह नाशिक, बंगळुरु,  अमेरिका, ब्रिटन येथे सेवा व्यवसाय आहेत.