भांडवली बाजारासाठी नव्या वर्षांची सुरुवात सावधरीत्या झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्समध्ये २०१५च्या पहिल्या दिवशी अवघ्या ८.१२ टक्क्यांची वाढ झाली. प्रमुख निर्देशांक २७,५०७.५४ वर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही किरकोळ, १.३० अंश वाढ होऊन निर्देशांक ८,२८४ वर राहिला.
२०१४ची अखेर करताना सेन्सेक्स गेल्या सलग पाच व्यवहारात २९९ अंशांनी वधारला आहे. २०१४ मधील ३० टक् के वाढीसह मुंबई निर्देशांकाने गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी बजाविली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरत्या दरांचा बिगरअनुदानित गॅस सििलडर तसेच हवाई इंधन दरातील कपातीचा परिणाम भांडवली बाजारावरही नोंदला गेला.e01किरकोळ गुंतवणूकदारांची पसंती असलेले स्मॉल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे १.२५ व ०.६५ टक्क्य़ांनी उंचावले. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ३जी ध्वनिलहरींसाठी प्रति मेगा हर्ट्झला किमान शुल्क सुचविल्याने या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग बाजारात ४ टक्क्य़ांपर्यंत वाढले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये १.०७ टक्क्य़ासह पोलाद निर्देशांक आघाडीवर राहिला. तर पाठोपाठ वाहन, भांडवली वस्तू, ग्राहकपयोगी वस्तू, स्थावर मालमत्ता निर्देशांक राहिले.