लस घेणाऱ्यांना सवलतीत आरोग्य विमा; ‘रिलायन्स जनरल इन्शुरन्स’ची योजना

देशातील कोणत्याही विमा कंपनीकडून टाकले गेलेले हे अशा प्रकारचे पहिले पाऊल आहे.

मुंबई : करोना प्रतिबंधक लसीची मात्रा घेतली असेल तर आरोग्य विमा योजनेच्या खरेदी तसेच नूतनीकरण हप्त्याच्या रकमेवर ५ टक्क््यांची सवलत देण्याची घोषणा रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीने केली आहे. कंपनीच्या ‘हेल्थ इन्फिनिटी’ या योजनेसाठी ही सवलत योजना म्हणजे, करोनाविरूद्ध लढ्यात योगदान आणि लसीकरणाला प्रोत्साहनच दिले जाईल, असा कंपनीचा दावा आहे. देशातील कोणत्याही विमा कंपनीकडून टाकले गेलेले हे अशा प्रकारचे पहिले पाऊल आहे.

रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्याधिकारी राकेश जैन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, विमा नियंत्रक ‘इर्डा’नेही कंपनीच्या हेल्थ इन्फिनिटी योजनेवरील या सवलतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

लसीचा केवळ एक डोस घेतलेले नवीन ग्राहक आणि पॉलिसीचे नूतनीकरण करीत असलेले विद्यमान विमाधारकही या मर्यादित काळासाठी लागू असलेल्या योजनेसाठी पात्र ठरतील, असे ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Discounted health insurance for vaccinators akp

ताज्या बातम्या