मुंबई : सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर मोफत अतिरिक्त सोन्याचा आनंद मिळवून देणारी योजना ‘पीएनजी ज्वेलर्स’ने अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने पुणे, मुंबई व गोव्यातील सर्व दालनांमध्ये योजली आहे. आवर्जून सोने खरेदी होणाऱ््या गुढीपाडवा व अक्षय्यतृतीया या काळात म्हणजे १ एप्रिलपासून १५ मे २०२२ पर्यंतच्या या ४५ दिवसांच्या योजनेचा लाभ ग्राहकांना मिळेल. सोन्याच्या दागिन्यांच्या प्रत्येक १० ग्रॅम खरेदीसाठी, ग्राहकांना अतिरिक्त १०० मिलिग्रॅम सोन्याचे नाणे मोफत मिळेल. तसेच किमान ५०,००० रुपयांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर प्रत्येक ग्राहकाला १०० मिलिग्रॅमचे एक सोन्याचे नाणे पूर्णपणे मोफत मिळेल आणि ५०,००० रुपयांच्या प्रत्येक अतिरिक्त खरेदीसाठी १०० मिलिग्रॅमचे अतिरिक्त नाणे मिळणार आहे. ग्राहक या योजनेचा लाभ म्हणून वास्तविक सोन्याची नाणी किंवा त्यांच्या वॉलेटमध्ये त्याच मूल्याचे डिजिटल गोल्डदेखील घेऊ शकतात.

वाशीमध्ये नवीन दालन

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये

‘पीएनजी ज्वेलर्स’च्या ३५ व्या दालनाचे नवी मुंबईत, सेक्टर १७, वाशी येथे नुकतेच उद्घाटन झाले. २५०० चौरस फूट प्रशस्त जागेत विस्तारलेल्या या दालनाच्या उद्घाटन समारंभाला अभिनेत्री रविना टंडन, ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ, कार्यकारी संचालक पराग गाडगीळ आणि ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.