गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे झालेले नुकसान हे महागाई वाढण्यास कारणीभूत ठरू शकत असले तरी यंदा मोसमी पाऊस चांगला झाल्यास येत्या ऑगस्टमध्ये महागाईचा दर ४ टक्क्यांवर ठेवता येईल, अशी अपेक्षा रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी व्यक्त केली.
रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी या वर्षांतील पहिल्या द्विमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. त्यात ही अपेक्षा व्यक्त केली.
सध्याच्या आकडेवारीनुसार अवकाळी पावसाने व गारपिटीने देशात रबी हंगामातील १७ टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. त्याने महागाईवर पारसा परिणाम झालेला नाही.
चालू वर्षी आतापर्यंत महागाईचा दर अपेक्षित मर्यादेत आहे. पण अल-निनोचा मॉन्सूनवर फारसा परिणाम झाली नाही आणि सामान्य प्रमाणात पाऊस झाला तर फारसे काळजीचे कारण राहणार नाही. ऑगस्ट महिन्यात महागाईचा दर ४ टक्क्य़ांवर असेल, तर वर्षअखेरीस तो ५.८ टक्क्य़ांच्या आसपास स्थिरावेल असा अंदाज आहे.