लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला जागतिक बँकेच्या अहवालातून दिलासा मिळाला आहे. २०१८- १९ या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ७.३ टक्के राहील, असा अंदाज जागतिक बँकेच्या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतरच्या दोन वर्षात तो ७.५ टक्क्यांवर झेप घेईल, असे आशादायी चित्र जागतिक बँकेच्या अहवालात रेखाटण्यात आले आहे.

जागतिक बँकेचा अहवाल प्रकाशित करण्यात आला असून झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची घौडदौड सुरुच राहील, असे यात म्हटले आहे. चीनचा आर्थिक विकासदर २०१९- २० मध्ये ६.२ टक्क्यांवर घसरेल आणि २०२१ मध्ये त्यांचा विकासदर ६ टक्क्यांवर घसरेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. २०१८- १९ या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ७.३ टक्के राहील आणि त्यानंतरच्या दोन वर्षात तो ७.५ टक्क्यांवर झेप घेईल, असेही यात म्हटले आहे. भारताची सद्यस्थिती पाहता नोटाबंदी आणि जीएसटी सारख्या धक्क्यातून सावरुन अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने घौडदौड करत असल्याचे स्पष्ट होते, जागतिक बँकेच्या विकास संभाव्यता विभागाचे संचालक आहान कोसे यांनी सांगितले.