विमा उद्योगाच्या भविष्यातील वृद्धीचा मार्ग

डिजिटायझेशन हा ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा नि:संशय सर्वात परवडणारा मार्ग ठरला आहे. विशेषत: पारंपरिकरित्या प्रयत्नपूर्वक ग्राहक मिळवून विम्याची विक्री करणाऱ्या विमा उद्योगासाठी हे डिजिटायझेशनचे पर्व विशेष लाभकारक ठरत आहे.

Uttans mango production hit by fire at solid waste plant
घनकचरा प्रकल्पाला लागणाऱ्या आगीचा उत्तनच्या आंबा उत्पादनाला फटका
ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!

विमा उद्योगाने डिजिटायझेशनचे पहिले पाऊल हे सोप्या पद्धतीने व सर्वाना समजता येतील अशी उत्पादने आणून टाकले आहे. विमा योजनांविषयी माहिती मिळविणे आणि त्याची ऑनलाइन खरेदी करणे ग्राहकांना आता सुलभ झाले आहे.  संपूर्ण वित्तीय सेवा उद्योगात विमा कंपन्यांनी त्यासाठी आवश्यक सुविधा दिल्या आहेत, यूजर इंटरफेसवर भर दिला आहे तसेच उत्पादनांची वैशिष्टय़े व लाभ तसेच पैशांचा भरणा सुलभ केला आहे.

उत्पादनांच्या श्रेणीमध्ये विमा कंपनी प्रामुख्याने ग्राहकांच्या पडताळलेल्या माहितीवर (जोखीम कमी करण्यासाठी) भर देते. यामुळे ऑनलाइन अर्जांमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून ग्राहकांच्या पडताळणीसाठी अभिनव मार्गाचा (जसे ‘आधार’वर आधारित पडताळणी) अवलंब करण्यात आला आहे.

यातील पुढची पायरी म्हणजे डिजिटायझेशनच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे फायदे समाविष्ट करणे. त्यात विक्री आणि अंतर्गत कार्यचालनाच्या महत्त्वाच्या प्रक्रिया स्वयंचलित करणे यांचा समावेश आहे. या सुसंवादासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

याठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की, विमा कंपनीचा प्रतिनिधी म्हणून ग्राहकांसमोर जाणाऱ्या विमा वितरक / विक्रेत्यांनी डिजिटायझेशनचा कसा उपयोग करायचा. वितरकांना आमची विविध उत्पादने, त्याचे फायदे, विविध अर्ज वगैरे त्यांच्या मोबाइलवर उपलब्ध झाले पाहिजे जेणेकरून ग्राहकांना विक्री करताना ते दाखवता येतील. अंतर्गत प्रक्रियेचा विचार करता नवीन व्यवसाय आणि सेवा प्रRियांमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. आमच्या उद्योगात ग्राहकाच्या अनेक कागदपत्रांची (उदा. केवायसी, उत्पन्नाचा पुरावा वगैरे.) गरज पडते. त्यासाठी केवळ फोटो काढून कागदपत्र जमा करण्याची सुविधा निर्माण करावी लागेल.

डिजिटायझेशनमुळे ग्राहकासोबतच्या प्रत्येक भेटीत गोळा केला गेलेला डेटा वाढण्यात मदत झाली आहे. भविष्यातील विश्लेषणासाठी हा डेटा वापरता येईल जेणेकरून विमा कंपन्यांना ग्राहकांची व वितरकांची आणखी सखोल कल्पना येऊ शकेल. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणून प्रतिक्रीया बंदिस्त करणे. आमच्याशी थेट जोडू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी विश्लेषणाच्या आधारे अधिक उत्तम उत्पादने तयार करून हे शक्य आहे.

या व्यतिरिक्त विमा कंपन्यांना हे देखील ध्यानात घेतले पाहिजे की, डिजिटायझेशन कशा प्रकारे त्यांना उद्योगासमोरील सर्वात मोठी समस्या असणाऱ्या दाव्यांची जलद पूर्तता करण्यासाठी मदत करेल.

– सुरेश अग्रवाल

(लेखक कोटक लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य वितरण अधिकारी आहेत.)