‘इनसाइडर ट्रेडिंग’च्या गुन्ह्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या भारतीय वंशाचे आणि गोल्डमन सॅचचे माजी संचालक रजत गुप्ता यांनी या शिक्षेविरोधात अमेरिकी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गुप्ता यांचे वकील गॅरी नाफ्तालिस यांनी न्यूयॉक येथील जिल्हा न्यायालयात याबाबतची याचिका दाखल केली आहे. ही याचिका केवळ दोषी ठरविल्याबाबत करण्यात आल्याचे  याचिकेत म्हटले आहे. गेल्या महिन्यात गुप्ता यांना दोन वर्षांचा कारावास आणि ५० लाख डॉलरच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.