मुंबई : सरकारी मालकीच्या स्टेट बँकेसह, खासगी क्षेत्रातील कोटक मिहद्र बँक आणि फेडरल बँकेने किरकोळ निधी आधारित कर्ज दर (एमसीएलआर) संलग्न कर्जाच्या व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. यातून या बँकांच्या वैयक्तिक, गृह तसेच वाहन यांसारखी ग्राहक कर्जे महाग होणार आहेत.

देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँक ऑफ इंडियाने एक वर्षांच्या कालावधीसाठी एमसीएलआर संलग्न व्याज दर २५ आधार बिंदूंनी वाढवून ७.९५ टक्क्यांवर नेले आहेत. बँकेचे सुधारित व्याजदर १५ ऑक्टोबर २०२२ पासून लागू झाले आहेत. एक वर्ष कालावधीच्या एमसीएलआर दरावर बहुतांश ग्राहक कर्जाचा व्याजदर निर्धारित होत असतो. कोटक मिहद्रा बँकेने, विविध कालावधीसाठी एमसीएलआर संलग्न व्याजाचे दर १६ ऑक्टोबर २०२२ पासून ७.७० टक्के ते ८.९५ टक्क्यांच्या श्रेणीत सुधारणा करून स्थापित केले आहेत. बँकेचा  सुधारित एक वर्षांचा एमसीएलआर संलग्न दर ८.७५ टक्के आहे. फेडरल बँकेने, एक वर्ष कालावधीसाठी एमसीएलआर संलग्न व्याजाचे दर १६ ऑक्टोबरपासून ८.७० टक्के करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या महिन्यात रेपो दरात वाढ केल्यानंतर, अनेक बँकांनी व्याजदरात वाढ करून कर्जे महाग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”