कोणीही माणूस जेवढय़ा लवकर टर्म प्लॅन घेईल तेवढे ते त्याच्यासाठी, कुटुंबासाठी चांगले. फरक इतकाच की, जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे जीवनविम्याच्या संरक्षणाची रक्कम बदलत जाते. ज्यांचे वय ६० वष्रे किंवा त्याहून अधिक आहे त्यांच्यासाठी टर्म प्लॅन घेण्याची शिफारस केली जात नाही. खरेतर जेव्हा व्यक्ती नोकरीस सुरुवात करते तेव्हाच टर्म प्लॅन घेतला पाहिजे आणि वाढत्या जबाबदाऱ्याबरोबर लाइफ कव्हर म्हणजे विमा संरक्षणाची रक्कम वाढवता नेता येऊ शकते.
आपल्या कुटुंबाचा संकटांपासून, जोखमींपासून बचाव करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची माणसाची सहजप्रवृत्ती असते. जेव्हा समोर धोके असतात तेव्हा आपण हे नसíगकरित्या करून मोकळे होतो; मात्र कुटुंबातील कमावत्या सदस्याचे अचानक निधन झाले तर आपल्या कुटुंबाला ज्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल त्यापासून आपल्या जिवलगांचे संरक्षण कसे करायचे याचा विचार मात्र आपण फारच कमी वेळा करतो. आज विभक्त कुटुंबपद्धतीचे चलन आहे आणि प्रत्येकजण अधिक चांगल्या जीवनशैलीची आकांक्षा ठेवतो. त्याच्यातूनच ‘मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना पुरेसे आíथक संरक्षण दिले आहे का?’, असा प्रश्न आपसूकच येतो.
समजा आपण तरुण आणि अविवाहित असू आणि आपल्यावर आपले पालक अवलंबून असतील किंवा आपण मुले असलेले विवाहित व्यक्ती असू तेव्हा आपल्यावर काही निश्चित अशा आíथक जबाबदाऱ्या असतातच. यामध्ये कुटुंबाच्या गरजा भागवणे, मासिक हप्ता भरणे, भविष्यातील स्वप्नांतील घरासाठी नियोजन करणे, मुलांच्या उच्च शिक्षणाची तजवीज करणे, लग्न आदींचा समावेश असतो. आपल्यापकी प्रत्येकजण या उद्दिष्टांसाठी बचत करत असतो. मात्र, कुटुंबातील कमावती व्यक्तीच जर निधन पावली तर हे सगळे नियोजन विस्कटून जाते. याच कारणासाठी प्रत्येक माणूस संरक्षित असणे गरजेचे आहे. ‘टर्म इन्शुरन्स’ हा कुटुंबाला आíथक संरक्षण पुरवण्याचा असाच एक किफायतशीर मार्ग आहे. टर्म इन्शुरन्स किंवा मुदत विमा हा जीवनविम्याचा सर्वात सोपा प्रकार आहे. या प्रकारच्या योजनेमध्ये विमाधारक हप्ता भरत जातो आणि विमा योजनेच्या मुदतीच्या काळात जर धारकाचा मृत्यू ओढवला तर कंपनी त्याने नामांकन केलेल्या व्यक्तीला आधी ठरलेली रक्कम देते.
पारंपरिक संयुक्त कुटुंबपद्धतीत आíथक पेचप्रसंग उद्भवल्यास कुटुंबातील अन्य सदस्य पुढे येत असतात. मात्र आताच्या काळात विभक्त कुटुंबपद्धती चलनात आल्यामुळे आíथक आधार देण्यासाठी कुटुंबातील अन्य सदस्य पुढे येतील, अशी शक्यता कमी होते. आपण तरुण असतो तेव्हा आपल्याला असे वाटत असते की, आपण आपल्या कुटुंबियांसाठी कायमच त्यांच्यासोबत असणार आहोत. मात्र आपली जीवनशैली, तणाव आणि अन्य अनेक घटकांमुळे आपण अशी अनेक उदाहरणे वाढत्या संख्येने पाहतो ज्यात माणसे आपल्या कुटुंबियांना पुरेशा आíथक संरक्षणाविना मागे सोडून गेली आहेत. कोणतीही योजना आपल्या घरातील कमावत्या सदस्याच्या जाण्याने झालेली हानी खऱ्या अर्थाने भरून काढू शकत नाही; मात्र एक टर्म प्लॅन हा अशा व्यक्तीच्या जाण्याने निर्माण झालेल्या आíथक परिणामांची काळजी घेऊ शकतो.
कोणीही माणूस जेवढय़ा लवकर टर्म प्लॅन घेईल तेवढे ते त्याच्यासाठी, कुटुंबासाठी चांगले. फरक इतकाच की, जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे जीवनविम्याच्या संरक्षणाची रक्कम बदलत जाते. ज्यांचे वय ६० वष्रे किंवा त्याहून अधिक आहे त्यांच्यासाठी टर्म प्लॅन घेण्याची शिफारस केली जात नाही. खरेतर जेव्हा व्यक्ती नोकरीस सुरुवात करते तेव्हाच टर्म प्लॅन घेतला पाहिजे आणि वाढत्या जबाबदाऱ्याबरोबर लाइफ कव्हर म्हणजे विमा संरक्षणाची रक्कम वाढवता नेता येऊ शकते.
आíथक संरक्षण दोन कारणांसाठी प्रामुख्याने गरजेचे असते – एक तर दायित्वांची म्हणजे देण्यांची फेड करण्यासाठी आणि भविष्यातील उत्पन्नाची खात्री मिळवण्यासाठी. प्रत्येक माणसाला घर घेण्याची, वाहन घेण्याची इच्छा ही असतेच. या मालमत्तांच्या खरेदीसाठी आपण सहसा कर्जही घेतो. जर या कर्जाचे हप्ते सुरू असतानाच कमावता माणूस काळाच्या पडद्याआड गेला तर काय करायचे? आपल्यामागे मालमत्ता ठेव, दायित्वे ठेवून जाऊ नका हे आपल्या कुटुंबासाठी आíथक संरक्षण मिळवण्यासाठीचे ब्रीदवाक्य आहे. टर्म प्लॅनच्या माध्यमातून विमाधारकाच्या कुटुंबाला आíथक स्थिरता मिळू शकते आणि भविष्यातील उत्पन्न सुनिश्चित करण्यासाठी टर्म प्लॅन काढणे हाच त्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. साधारणत: असे मानले जाते की, तरुण माणसाने आपल्या वार्षकि उत्पन्नाच्या २० ते ३० पट छत्र देणारा टर्म प्लॅन खरेदी केला पाहिजे. आपल्या चाळीशीत असलेल्या माणसासाठी त्याच्या उत्पन्नाच्या १० – २० पटींचे छत्र कव्हर सुयोग्य ठरते आणि पन्नाशीत असलेल्या माणसासाठी ५ ते १० पट विमा छत्र उपयुक्त ठरते. आपले वय जसजसे वाढत जाते तसतशी जीवन छत्राची गरज कमी होत जाते. विमा योजनेची सुयोग्य मुदत ही आपल्या निवृत्तीच्या वयापर्यंतची असावी.
विमा धारकाने जीवनविमा काढणाऱ्या व्यक्ती, संस्थेला सर्व संबंधित माहिती प्रामाणिकपणे द्यावी. दाव्याच्या प्रसंगी आपल्या वारसाला कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागू नये यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण जर आपला दावा (क्लेम) नाकारलाच गेला तर ज्या कारणासाठी विमा योजना आहे तो उद्देशच व्यर्थ गेला, असा अर्थ होतो.
सर्व जीवनविमा कंपन्या या टर्म प्लॅन देतात आणि त्यांच्या प्रिमियमच्या रकमा वेगवेगळय़ा असतात. त्याने माणसाच्या मनात गोंधळ होऊ शकतो. सर्वात स्वस्त किंवा सर्वात महाग योजना खरेदी करणे हा त्यावरचा उपाय नव्हे. आपण जीवन विमा देणाऱ्याचे दावे निकाली निघण्याचे प्रमाण आधी अभ्यासून मगच योजनेची खरेदी करावी.
शेवटी असे म्हणता येईल की, वित्तीय योजना आखण्याच्या मार्गावरील टर्म प्लॅन हे एक प्रकारचे पहिले पाऊल आहे.
लेखक आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे कार्यकारी संचालक आहेत.