13 August 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : विषाणू बाधारहित नवपिढीचा व्यवसाय

कंपनीचा मुख्य व्यवसाय मोबाइल जाहिरातींद्वारे विपणन गुंतवणुकीवर परतावा वाढविणे आणि डिजिटल जाहिरातीतून होणारी फसवणूक कमी करणे आहे

संग्रहित छायाचित्र

अजय वाळिंबे

वर्षभरापूर्वी ७३५ रुपये अधिमूल्याने आपले शेअर्स आयपीओद्वारे शेअर बाजारात नोंदणी करणाऱ्या अ‍ॅफल इंडिया या नवोदित कंपनीची माहिती काही जाणकार गुंतवणूकदारांना नक्कीच असेल. या आयपीओला गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. अर्थात, ज्या भाग्यवान गुंतवणूकदारांना हे शेअर्स मिळाले त्यांना भरपूर फायदा झाला आहे.

अ‍ॅफल होल्डिंग्स ही सिंगापूरस्थित कंपनी अ‍ॅफल इंडियाची प्रवर्तक असून कंपनीच्या प्रमुख भागधारकांमध्ये मायक्रोसॉफ्ट, इतोचू, बेनेट कोलेमन आणि डी२सी या नामांकित कंपन्यांचा समावेश होतो. अ‍ॅफल इंडिया एक जागतिक तंत्रज्ञान कंपनी असून जी कन्झ्युमर इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मवरून मोबाइल जाहिरातीद्वारे गुंतवणूक, अधिग्रहण आणि इतर व्यवहार वितरित करते. कंपनीचा मुख्य व्यवसाय मोबाइल जाहिरातींद्वारे विपणन गुंतवणुकीवर परतावा वाढविणे आणि डिजिटल जाहिरातीतून होणारी फसवणूक कमी करणे आहे. कंपनीचा डेटा ऑनलाइन आणि ऑफलाइन कंपन्या वापरत असून, एंटरप्राइझ प्लॅटफॉर्म ऑफलाइन कंपन्यांना प्लॅटफॉर्म-आधारित अॉप डेव्हलपमेंट, ओ टू ओ कॉमर्स सक्षम करणे आणि ग्राहकांना डेटा प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन जाण्यास मदत करते.

कंपनीने मार्च २०२० साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे वित्तीय निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत कंपनीने ३३.८ टक्के वाढीसह उलाढाल ३३४ कोटींवर नेली आहे, तर नक्त नफ्यात ३४.४ टक्के वाढ होऊन तो ६६ कोटींवर गेला आहे. अनेक उद्योग कोविड-१९ मुळे अडचणीत आले असले तरीही अ‍ॅफलसारख्या कंपन्यांना या परिस्थितीचा फायदादेखील होऊ शकतो. विकसनशील देशांतील बहुतांशी कंपन्या डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळत असून त्याचा मोठा फायदा कंपनीला होऊ  शकतो. कंपनीची १०० टक्के उपकंपनी असलेल्या अ‍ॅफल इंटरनॅशनलने नुकतीच अ‍ॅपनेक्स्ट पीटीई या सिंगापूरमधील कंपनी ताब्यात घेण्यासाठी त्या कंपनीचे समभाग खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या अधिग्रहणाचा कंपनीच्या व्यवसायवृद्धीसाठी चांगला फायदा होऊ शकेल. दीर्घ ते मध्यम कालावधीत हा शेअर चांगला फायदा करून देईल.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलिओ’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करावी.

अ‍ॅफल इंडिया लिमिटेड

(बीएसई कोड – ५४२७५२)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १४७७.९५

स्मॉल कॅप

प्रवर्तक : अ‍ॅफल होल्डिंग्स, सिंगापूर

उद्योग क्षेत्र : डिजिटल मार्केटिंग

बाजार भांडवल : रु. ३,७६८ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :                          रु.  २,२९६/७५१

भागभांडवल भरणा : रु. २५.५ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६८.३८

परदेशी गुंतवणूकदार ७.५४

बँक/ म्यु. फंड/ सरकार   ११.३९

इतर/ जनता    १२.६९

पुस्तकी मूल्य : रु. ८९.८८

दर्शनी मूल्य :   रु. १०/-

लाभांश :   –%

प्रति समभाग उत्पन्न : रु. २५.७

पी/ई गुणोत्तर : ५७.६

समग्र पी/ई गुणोत्तर :   १७.२६

डेट इक्विटी गुणोत्तर :   ०.२९

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :   ५६.८

रिटर्न ऑन कॅपिटल :    २६.२

बीटा : ०.६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 12:13 am

Web Title: article on affle holdings share abn 97
Next Stories
1 कर बोध : विवरणपत्र कोणी-कोणता फॉर्म भरावा?
2 बाजाराचा तंत्र कल : तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी!
3 नावात काय : विंडफॉल
Just Now!
X