आशीष ठाकूर

गेल्या आठवडय़ातील ‘अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येवर’ या लेखात, भांडवली बाजाराच्या अर्थसंकल्पासंबंधी तीन प्रकारच्या प्रतिक्रियांची शक्यता वर्तविण्यात आली होती. अर्थसंकल्पाकडून भांडवली बाजाराचा व गुंतवणूकदारांचा घोर अपेक्षाभंग झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे आणि लेखात वर्तविलेली शक्यता क्रमांक ३ प्रत्यक्षात येऊन निर्देशांकांनी आपला भरभक्कम आधार सेन्सेक्सवर ४०,८०० आणि निफ्टीवर १२,००० चा स्तर तोडला आहे. शक्यता क्रमांक ३ प्रमाणे निर्देशांकांचे प्रथम खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४०,००० आणि निफ्टीवर ११,८०० येईल, असेही भाकीत त्या लेखात होते. हे खालचे लक्ष्य अर्थसंकल्प सादर झाल्यावर लगेचच साध्य झाल्याचे दिसले. या पार्श्वभूमीवर या आठवडयाच्या वाटचालीकडे वळू या.

शनिवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३९,७३५.५३

निफ्टी : ११,६६१.९०

अर्थसंकल्प सादर झाल्याच्या दिवसांतर्गत, म्हणजे शनिवारी सेन्सेक्सवर १,००० अंशांची आणि निफ्टीवर ३०० अंशांची घसरण झाली. या रक्तपाताची भीती ही एक महिन्या अगोदरपासून, या स्तंभातील प्रत्येक लेखात व्यक्त करून, गुंतवणूकदारांना सावध केले गेले होते.

या सदरातील ६ जानेवारी २०२० च्या लेखातील वाक्य होते, ‘‘गेल्या आठवडयात निर्देशांकानी आपले तेजीचे पहिले वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४१,८०० आणि निफ्टीवर १२,३०० साध्य केल्याने, या स्तरावर गुंतवणूकदारांनी समभाग खरेदी करण्यापेक्षा, समभागांच्या नफारूपी विक्रीवर लक्ष्य केंद्रित करण्याची गरज आहे.’’ आपल्या उराशी बाळगलेली स्वप्न ही तेजीतच प्रत्यक्षात येऊ शकतात. कागदोपत्री नफा हा ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’सारखा असतो. तेव्हा सेन्सेक्सवर ४२,५०० ते ४३,५०० आणि निफ्टीवर १२,५०० ते १२,८०० स्तरांच्या मृगजळामागे धावण्यापेक्षा, निर्देशांकाच्या प्रत्येक वाढीव टप्यावर २५ टक्कय़ांच्या चार तुकडयात नफ्यात असलेल्या समभागांची विक्री करून तो नफा गाठीशी बांधणे श्रेयस्कर.

येणाऱ्या दिवसात मंदीच्या वातावरणात एक हलकीशी सुधारणा ही सेन्सेक्सवर ४०,००० ते ४०,८०० आणि निफ्टीवर ११,८०० ते १२,००० अशी असेल. मात्र त्या नंतर प्रलंबित असलेले निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३८,७०० आणि निफ्टीवर ११,५०० असे प्रत्यक्षात साकारलेले दिसून येईल.

आगामी तिमाही निकालांकडे..

१) टाटा ग्लोबल बीव्हरेजेस लि.

* तिमाही निकाल – मंगळवार, ४ फेब्रुवारी

* शनिवार,१ फेब्रुवारीचा भाव – ३७२.४० रु.

* निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – ३६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३६० रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य ४०० रुपये. भविष्यात ३६०

रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ४३० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ३६० ते ४०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशाजनक निकाल : ३६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३३० रुपयांपर्यंत घसरण.

२) टायटन कंपनी लिमिटेड

* तिमाही निकाल- मंगळवार,४ फेब्रुवारी

* शनिवार, १ फेब्रुवारीचा भाव – १,१७४.२५रु.

* निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – १,१८० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,१८० रुपयांचा स्तर  राखत,समभागाचे पहिले वरचे लक्ष्य १,२२० रुपये. भविष्यात १,१८० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,२८० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १,१८० ते १,२२० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशाजनक निकाल : १,१८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,०९० रुपयांपर्यंत घसरण.

३) ल्युपिन लिमिटेड

* तिमाही निकाल –  गुरुवार,  ६ फेब्रुवारी

* शनिवार,१ फेब्रुवारीचा भाव- ७०७.१५ रु.

* निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – ७०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७०० रुपयांचा स्तर राखत, समभागाचे पहिले वरचे लक्ष्य ७६० रुपये. भविष्यात ७०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ८०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ७०० ते ७६० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशाजनक निकाल : ७०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६७० रुपयांपर्यंत घसरण.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.