25 October 2020

News Flash

आरोग्यम् धनसंपदा!

‘मुदत विमा + क्रिटिकल इलनेस’ असा एकत्रित कवचाचा पर्यायच सद्य:स्थितीत सुयोग्य कसा ठरतो, याचा ऊहापोह..

(संग्रहित छायाचित्र)

जेराल्ड डिसूझा

‘मुदत विमा + क्रिटिकल इलनेस’ असा एकत्रित कवचाचा पर्यायच सद्य:स्थितीत सुयोग्य कसा ठरतो, याचा ऊहापोह..

आपण सगळ्यांनीच ‘आरोग्यम् धनसंपदा’ म्हणजे चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती वगैरे वाक्य कधी ना कधी ऐकली असतील. पण आपण आरोग्याच्या या धनवैभवाबाबत खरेच गंभीर असतो का? बहुतांशांचे उत्तर नाही असेच असेल. आजच्या गतिमान आयुष्यात आपली सतत कशाच्या तरी मागे धाव सुरू असते आणि शांत बसून जेवायलाही आपल्यापाशी फुरसत नसते. काही-बाही पोटात ढकलणं आणि रात्री उशिरापर्यंत जागरणं याचा आरोग्यावर थेट परिणाम होत असतो.

अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयवाहिनी आणि श्वसनाच्या व्याधी आदी जीवनशैलीशी संलग्न आजार झपाटय़ाने वाढत आहेत. समतोल आहार आणि नियमित व्यायामाने त्यांना दूर ठेवता येते. तरीही आनुवांशिक कारणे किंवा वाढत्या वयासोबत असे जीवघेणे आजार होण्याची शक्यता बळावते. अशा आजारांचा उपचार प्रचंड खर्चीक आणि कौटुंबिक बचतीचा घात करून आर्थिक घडी बिघवडू शकते. म्हणूनच आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र स्वत:ला आणि आपल्या कुटुंबीयांना सुयोग्य विमाकवच देऊन सुरक्षित ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. हे सुयोग्य विमाकवच म्हणजे काय? तर रुग्णालयीन उपचार खर्चाची भरपाई करणारा आरोग्यविमा (मेडिक्लेम) किंवा मृत्यू झाल्यास जीवन विम्याची रक्कम देणाऱ्या आयुर्विमा पॉलिसीऐवजी मुदतीचा विमा अथवा टर्म प्लान + क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसी हा अधिक चांगला पर्याय आहे. कारण यातून कोणताही गंभीर आजार झाल्यास विमेदाराला ठरावीक रक्कम मिळते आणि मृत्यू झाल्यास कुटुंबाला विम्याची रक्कम मिळते. जीवन विमा आणि क्रिटिकल इलनेसचा रायडर असा प्राथमिक प्लॅन यात असतो.

पॉलिसीमध्ये नमूद केलेल्यापैकी कोणताही गंभीर आजार झाल्यास विमा कंपनी एकरकमी लाभ देते. हृदयविकाराचा धक्का, मस्तिष्काघात (स्ट्रोक), मूत्रपिंड निकामी होणे, कर्करोग, अवयव प्रत्यारोपण, अर्धागवायू, ब्रेन टय़ूमर, अल्झायमर आणि अन्य अनेक गंभीर व्याधींचा ‘क्रिटिकल इलनेस’मध्ये समावेश होतो. विमा कंपन्या जवळपास ३६ ते ४० प्रकारच्या गंभीर आजारांचा यात समावेश करतात. तुम्हाला नेमके काय हवे आहे ते पाहून त्यानुसार तुम्ही पॉलिसी निवडू शकता.

काही प्रकारच्या मुदत विमा (टर्म प्लॅन) + क्रिटिकल इलनेस प्लानचे फायदे असणाऱ्या योजनेत विमा कंपनीने नमूद न केलेल्या एखाद्या गंभीर आजाराचेही कवच तुम्ही घेऊ शकता. काही योजनांमध्ये टर्म प्लॅनअंतर्गत मिळणाऱ्या रकमेचा ५० टक्के वाटा गंभीर आजारांसाठी ठेवता येतो. गंभीर आजारांच्या उपचारांवर बराच पैसा आणि वेळ जातो. तुम्ही घरातले कमावते असाल आणि आणि तुम्हाला एखादा गंभीर आजार झाला तर उपचारांसाठी नोकरी सोडावी लागण्याची शक्यता असते. परिणामी, नियमित वेतन/ उत्पन्न बंद होते २. वैद्यकीय चाचण्या, औषधोपचार यामुळे खर्चात वाढ होते.

मेडिक्लेम योजनेत फक्त रुग्णालयात दाखल झाल्यास पैसे मिळतात. मात्र क्रिटिकल इलनेस कव्हरमध्ये हॉस्पिटलचा खर्च काहीही असला तरी गंभीर आजार झाल्यास तुम्हाला एकरकमी पैसे मिळतात.

मुदतीच्या विम्याचे कवच किती असावे? जीवन विम्याची रक्कम ठरवताना सध्याचे वार्षिक उत्पन्न आणि घराचे कर्ज इत्यादीसारख्या जबाबदाऱ्यांचा विचार करायला हवा. साधारणपणे तुमचे वार्षिक उत्पन्न आणि कर्जाची रक्कम यांच्या १५ ते २० पट रकमेचा विमा तुम्ही काढायला हवा. मुदत विम्यामध्ये तुम्हाला अत्यंत परवडणाऱ्या दरात तुमच्या गरजांनुरूप योग्य रकमेच्या विम्याचे कवच मिळविता येते.

स्वत:साठी टर्म प्लान + क्रिटिकल इलनेसचे कवच घेऊन, स्वत:सह कुटुंबाला सुरक्षित करणे ही आजच्या कमालीच्या अनिश्चित बनलेल्या काळातील सर्वोत्कृष्ट गोष्ट तुम्ही करू शकता. पण हे करताना जीवनशैलीतही सकारात्मक बदल करा आणि आजारी पडण्याच्या, रुग्णालयात जाण्याच्या शक्यतांना संपुष्टात आणा. थोरामोठय़ांनी सांगितलेच आहे.. आरोग्यम् धनसंपदा!

(लेखक ‘एगॉन लाइफ’च्या विपणन विभागाचे साहाय्यक उपाध्यक्ष)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 1:03 am

Web Title: article on find out how the term insurance critical illness is the best option in the current scenario abn 97
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : अचूक लक्ष्यवेध!
2 अर्थ वल्लभ : विजेत्याचा शाप
3 माझा पोर्टफोलियो : मायक्रो कॅप, पण गुणवत्ता आणि कामगिरीत श्रेष्ठ!
Just Now!
X