portfolioभारती इन्फ्राटेल ही दूरसंचार  व्यवसायातील महत्त्वाचे अंग असलेल्या टेलिकॉम टॉवर्समधील एक आघाडीची कंपनी असून सध्या कंपनीकडे ८५,०८६ टॉवर्स आहेत. अर्थात यापकी ४७,०२२ टॉवर्स इंडस या कंपनीचे असले तरी या कंपनीत ४४% हिस्सा भारतीचा आहे. इतर प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत आपला देश इंटरनेट आणि डेटा ट्रान्सफरमध्ये अद्याप मागे असला तरीही गेल्या काही वर्षांत मात्र परिस्थिती झपाटय़ाने बदलत आहे. टू  जी, थ्री जी आणि आता फोर जी यामुळे डेटा ट्रान्सफर आणि वेग यांचे महत्त्व आणि गरज वाढू लागली आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत टॉवर्सच्या संख्येत नाममात्र एक ते चार टक्के दरानेच वाढ झाली असली तरीही आता रिलायन्स जियो आणि इतर टेलिकॉम कंपन्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे येत्या दोन वर्षांत टॉवर्स आणि इतर पायाभूत सुविधांची मागणी वाढेल.
av-03डिसेंबर २०१४ अखेर समाप्त आíथक तिमाहीतील कंपनीच्या आर्थिक कामगिरीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून कंपनीने गेल्या तिमाहीच्या तुलनेत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. उलढालीत ८% वाढ होऊन ती २,४४९ कोटींवर गेली आहे तर नक्त नफ्यातही २३% वाढ होऊन तो ५०७ कोटींवर गेला आहे. सध्या भारतातील एकंदर टॉवर्सपकी ३७.८% हिस्सा भारती इन्फ्राटेलचा असून येत्या दोन वर्षांत कंपनी भांडवली खर्चात वाढ करून आपला हिस्सा वाढवेल अशी आशा आहे. भारताखेरीज कंपनी श्रीलंका आणि बांगलादेशमध्येही संधी शोधत आहे. कंपनीची नगदी आवक उत्तम असून, भागधारकाना चांगले लाभांश वाटपही ती करत आहे. केवळ ०.४ बीटा असलेला हा शेअर तुम्हाला १२-१८  महिन्यात  चांगला परतावा देऊ शकेल.
stocksandwealth@gmail.com