|| आशीष ठाकूर

कालच्या मतदानोत्तर चाचण्यांचे कल व प्रत्यक्ष निकालात तीन दिवसांचा अवकाश आहे; पण या तीन दिवसांत बाजारात मात्र जबरदस्त धुरळा उडणार आहे. हे संभाव्य घातक चढ-उतार कसे हाताळावेत हे विस्तृतपणे जाणून घेण्याअगोदर गेल्या आठवडय़ाचा साप्ताहिक बंद जाणून घेऊ या.

शुक्रवारचा बंद भाव:

  • सेन्सेक्स: ३७,९३०.७७
  • निफ्टी: ११,४०७.२०

गेल्या लेखात उल्लेख केलेला सेन्सेक्सवरील ३७,००० व निफ्टीवर ११,१०० चा स्तर राखत निर्देशांकांनी वरची उसळी मारली. येणाऱ्या दिवसांतील राजकीय नाटय़पूर्ण घडामोडीत निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ३७,००० व निफ्टीवर ११,१०० चा स्तर राखल्यास प्रथम वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ३८,००० व निफ्टीवर ११,४५० असे असेल. प्रत्यक्ष निकालात पूर्ण बहुमताचे सरकार आल्यास सेन्सेक्स ३८,५०० व निफ्टी ११,५७० च्या स्तराला गवसणी घालेल. भविष्यात हा स्तर निर्देशांकांनी सातत्याने पंधरा दिवस राखल्यास निर्देशांक मंदीच्या विळख्यातून बाहेर येऊन सेन्सेक्सवर ३९,८०० व निफ्टीवर ११,९५० चा नवीन उच्चांक दृष्टिपथात येईल; पण जर का त्रिशंकू लोकसभेचे चित्र समोर आल्यास सेन्सेक्सवर ३७,००० व निफ्टीवर ११,१०० चा स्तर तोडत निर्देशांक प्रथम सेन्सेक्सवर ३५,१५० व निफ्टीवर १०,५५० व नंतर सेन्सेक्सवर ३३,३०० व निफ्टीवर १०,००० चे खालचे लक्ष्य असेल; पण जर का राजकीय पटलावर गोंधळाची, अनिश्चितता जन्माला आल्यास, मंदीच्या सुनामीचा तळ हा सेन्सेक्सवर ३०,५०० व निफ्टीवर ९,२०० असेल. या स्तरावर बाजाराचे सर्व नष्टचर्य संपून मग ते अमेरिका-चीन व्यापार युद्ध, तेलाची उकळी अथवा कमकुवत रुपया या सर्व निराशाजनक गोष्टी किमतीत अंतर्भूत होऊन, भविष्यकालीन तेजीचा पाया रचला जाईल. तेव्हा गुंतवणूकयोग्य रक्कम एकदम न गुंतवता प्रत्येक घसरणीत २० टक्के रक्कम गुंतविणे श्रेयस्कर.

आता आपण त्रमासिक निकालाकडे वळू या.

१) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन

तिमाही निकाल – सोमवार, २० मे

१७ मेचा बंद भाव – ३७६.२० रु.

निकालानंतर केंद्रिबदू स्तर – ३५० रु.

(अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने ३५० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ३९० ते ४१० रुपये. भविष्यात ४१० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ४५० ते ४८० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

(ब) सर्वसाधारण निकाल : ३५० ते ३९० रुपयांच्या पट्टय़ात (बॅण्ड) मध्ये वाटचाल.

(क) निराशादायक निकाल : ३५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम ३२० व नंतर २८० रुपयांपर्यंत घसरण

२) आरबीएल बँक

तिमाही निकाल – बुधवार, २२ मे

१७ मेचा बंद भाव – ६५५.७५ रु.

निकालानंतर केंद्रिबदू स्तर – ६०० रु.

(अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने ६०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ६९० रुपये. भविष्यात ६९० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ७५० ते ८०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

(ब) सर्वसाधारण निकाल : ६०० ते ६९० रुपयांच्या पट्टय़ात (बॅण्ड) मध्ये वाटचाल.

(क) निराशादायक निकाल : ६०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ५८० ते ५५० रुपयांपर्यंत घसरण.

३) डीव्हीज् लॅब

तिमाही निकाल – शनिवार, २५ मे

१७ मेचा बंद भाव – १,६३२.७० रु.

निकालानंतर केंद्रिबदू स्तर – १,६०० रु.

(अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने १,६०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १,६८० ते १,७०० रुपये. भविष्यात १,७०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,७८० ते १,८५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

(ब) सर्वसाधारण निकाल : १,६०० ते १,६८० रुपयांच्या पट्टय़ात (बॅण्ड) मध्ये वाटचाल.

(क) निराशादायक निकाल : १,६०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम १,५५० व नंतर १,४५० रुपयांपर्यंत घसरण.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.