|| आशीष ठाकूर

निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ३७,००० आणि निफ्टीवर ११,००० चा स्तर तोडल्यामुळे बाजारात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात गुरुवारी सेन्सेक्स ३७,००० आणि निफ्टी ११,००० स्तराखाली टिकल्याने बाजाराची परिस्थिती ही ‘नाकावर सूत’ असल्यागत झाली आहे. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३७,११८.२२

निफ्टी : १०,९९७.३५

या स्तंभातील २२ जुलैच्या ‘रक्तपात’ लेखातील सेन्सेक्सवरील ३६,००० आणि निफ्टीवरील १०,८०० च्या खालच्या लक्ष्यासमीप निर्देशांक गेल्या गुरुवारी पोहोचला. आता चालू असलेल्या क्षीण स्वरूपाच्या सुधारणेचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,१५० ते ३८,००० आणि निफ्टीवर ११,१७० ते ११,४५० असे असेल. हा स्तर ओलांडण्यास निर्देशांक अपयशी ठरल्यास पुन्हा मंदीचे आवर्तन सुरू होऊन निर्देशांक ऑक्टोबरपर्यंत सेन्सेक्सवर ३४,५०० आणि निफ्टीवर १०,३०० पर्यंत खाली घसरू शकतो.

निकाल हंगामाचा वेध..

१) टायटन कंपनी लिमिटेड

  • तिमाही निकालाची तारीख – मंगळवार, ६ ऑगस्ट
  • शुक्रवार २ ऑगस्टचा बंद भाव – १,०६२.९० रुपये.
  • निकालानंतरचा महत्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,०४० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,०४० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १,१०० रुपये. भविष्यात १,१०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,१७५ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १,०४० ते १,१०० रुपयांच्या पट्टयात वाटचाल

क) निराशादायक निकाल : १,०४० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम ९८० व त्यानंतर ९१० रुपयांपर्यंत घसरण.

२) सिप्ला लिमिटेड 

  • तिमाही निकालाची तारीख – बुधवार, ७ ऑगस्ट
  • शुक्रवार २ ऑगस्टचा बंद भाव – ५१५.७० रुपये
  • निकालानंतरचा महत्वाचा केंद्रबिंदू स्तर – ५५० रु.(शुक्रवारचा बंद भाव या स्तराखालीच आहे)

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५५० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ५७५ रुपये. भविष्यात ५७५ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ६१० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : ५५० ते ५७५ रुपयांच्या पट्टयात वाटचाल

क) निराशादायक निकाल : ५५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम ४९० व त्यानंतर ४५० रुपयांपर्यंत घसरण

३) ल्युपिन लिमिटेड

  • तिमाही निकालाची तारीख – बुधवार, ७ ऑगस्ट
  • शुक्रवार २ ऑगस्टचा बंद भाव – ७६५.८० रुपये
  • निकालानंतरचा महत्वाचा केंद्रबिंदू स्तर – ७४५ रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७४५ रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ८०० रुपये. भविष्यात ८०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ८३० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : ७४५ ते ८०० रुपयांच्या पट्टयात वाटचाल

क) निराशादायक निकाल : ७४५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७०० रुपयांपर्यंत घसरण

४) व्होल्टास लिमिटेड

  • तिमाही निकालाची तारीख – बुधवार, ७ ऑगस्ट
  • शुक्रवार २ ऑगस्टचा बंद भाव – ६१३.५० रुपये
  • निकालानंतरचा महत्वाचा केंद्रबिंदू स्तर – ५७० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५७० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ६५० रुपये. भविष्यात ६५० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ७०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : ५७० ते ६५० रुपयांच्या पट्टयात वाटचाल

क) निराशादायक निकाल : ५७० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५४५ रुपयांपर्यंत घसरण.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.