अजय वाळिंबे

आपल्याकडे दिवाळीचे महत्व काही वेगळेच आहे. दिवाळीत महत्वाचे तीन दिवस पाडवा, भाऊ बीज आणि अर्थात लक्ष्मी पूजन. आजच्या लेखात आपल्या ‘पोर्टफोलियो’साठी एकाच कंपनीच्या शिफारसीऐवजी सध्याच्या परिस्थितीत आकर्षक वाटणाऱ्या काही निवडक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स सुचवत आहे. ही मुहूर्ताची खरेदी असल्याने अर्थात गुंतवणूक कालावधी किमान एक वर्षांचा किंवा दीर्घकालीन अभिप्रेत आहे. नेहमी विचारात घेत असलेली गुणोत्तरे, कर्जाचे प्रमाण तसेच कामकाज क्षेत्र लक्षात घेऊन ही गुंतवणूक सुचविलेली आहे.

सध्याचा शेअर बाजारचा माहोल बघता शेअर्समधील गुंतवणूक खूप काळजीपूर्वक करायला हवी. त्यामुळेच सुचविलेले शेअर्सदेखील मुहूर्ताखेरीज पडत्या बाजारात संधी मिळेल तसे खरेदी करायचे धोरण ठेवावे. शेअर्स खरेदी व्यतिरिक्त पोर्टफोलिओ समतोल राखण्यासाठी म्युच्युअल फंड्स तसेच गोल्ड ईटीएफचा देखील जरूर विचार करा.

‘पोर्टफोलियो’च्या वाचकांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.