फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार : समभाग गुंतवणूक  
जोखीम प्रकार     : समभाग गुंतणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही).       
गुंतवणूक: हा फंड ‘बॉटम्स अप इन्व्हेस्टमेंट अ‍ॅप्रोच’ या तंत्राने प्रामुख्याने लार्ज कॅप व निफ्टी निर्देशांकातील प्रभावानुसार उद्योगक्षेत्रात गुंतवणूक करणारा     फंड आहे.गुंतवणूक केल्यापासून दोन वर्षांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास एक टक्का निर्गमन (एग्झिट लोड) अधिभार आकारण्यात येईल. मुंबई शेअर बाजाराचा एस अँड पी बीएसई २०० निर्देशांक या योजनेचा संदर्भ निर्देशांक आहे.
निधी व्यवस्थापक : हरीश जव्हेरी आणि जय कोठारी  
पर्याय    : वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (पे-आऊट व रिइन्व्हेस्ट)
फंड खरेदीची पद्धती    :1800 200 4499 (एमटीएनएल व बीएसएनएल वगळून) या क्रमांकावर (सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यत) संपर्क केल्यासकंपनीचा गुंतवणूकदार सेवा प्रतिनिधी संपर्क करेल. म्युच्युअल फंडाच्या विक्रेत्यामार्फत अथवा http://www.dspblackrock.com वेबस्थळावरून थेट खरेदी करता येईल.

फंड हा केवळ २५ कंपन्या हेरून त्यांच्या समभागांवर केंद्रित  (फोकस्ड) गुंतवणूक करणारा असल्याने या प्रकारच्या फंडासाठी ‘शार्प रेशो’ महत्वाचा ठरतो. म्युच्युअल फंडाने मिळविलेला परतावा हा चतुरपणे केलेल्या गुंतवणुकीमुळे की निधी व्यवस्थापकाने अतिरिक्त जोखीम घेतल्यामुळे हे मोजण्याचे साधन म्हणजे शार्प रेशो होय.
av-02
मागील सोमवारी मे महिन्यात सात वष्रे पुरी केलेल्या फंडाचे विश्लेषण जाणून घेतले. आज मे महिन्यातच पाच वष्रे पुरी करत असलेल्या फंडाविषयी जाणून घेऊ. गुंतवणूकदाराला डायव्हर्सफिाइड इक्विटी फंड ज्यामध्ये ४० ते ७० कंपन्या असलेल्या म्युच्युअल फंडांच्या योजना किंवा दुसऱ्या बाजूला २० वा २५ कंपन्यात गुंतवणूक करणाऱ्या योजना असा पर्याय असतो. आजची योजना यापकी दुसऱ्या प्रकारची म्हणजे कंपनीकेंद्रित गुंतवणूक करणारी योजना आहे. या फंडाचे प्राथमिक उद्दिष्ट दीर्घकालीन गुंतवणूक करून भांडवली नफा कमावणे हा आहे. गुंतवणुकीतील जोखीम नियंत्रित करण्याच्या उद्देशाने निधी व्यवस्थापक केवळ बाजार मूल्यानुसार पहिल्या २०० कंपन्यांतून निधी व्यवस्थापक अव्वल २५ कंपन्या निवडून या कंपन्यात दीर्घकालीन गुंतवणूक करेल.
अन्य शास्त्रांप्रमाणे गुंतवणुकीत देखील काही नियम किंवा सिद्धांत आहेत आणि या सिद्धांताचा वापर एखाद्या पोर्टफ़ोलियोची कार्यक्षमता मोजण्यासाठी केला जातो. ‘बीटा’ हा यापकी एक होय. एखाद्या म्युच्युअल फंडाने त्याच्या संदर्भ निर्देशांकाच्या तुलनेत किती अधिक परतावा दिला हे मोजण्याचे परिणाम म्हणजे बीटा. बीटा हे परिमाण एखाद्या शेअरचे स्वतंत्र मूल्यमापन करण्यासाठी न वापरता अनेक शेअरच्या समूहास म्हणजे एखादी पोर्टफोलिओची कार्यक्षमता मोजण्यासाठी वापरला जातो.  कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूक करण्यात जोखीम असते तिला ‘सिस्टेमिक रिस्क’ किंवा ‘मार्केट रिस्क’ असे म्हटले जाते. प्रख्यात गुंतवणूक गुरू विल्यम शार्प यांनी ही सिस्टेमिक रिस्क मोजण्याची पद्धत शोधली व जगमान्य झालेल्या या परिमाणास शार्प रेशो असे म्हटले जाते. म्युच्युअल फंडाने मिळविलेला परतावा हा चतुरपणे केलेल्या गुंतवणुकीमुळे मिळाला की निधी व्यवस्थापकाने अतिरिक्त जोखीम घेतल्यामुळे हे मोजण्याचे साधन म्हणजे शार्प रेशो. आजचा फंड हा केवळ २५ कंपन्या हेरून त्यांच्या समभाग-केंद्रित गुंतवणूक करणारा असल्याने या प्रकारच्या फंडासाठी शार्प रेशो महत्वाचा ठरतो. कंपनीकेंद्रित गुंतवणुका करणाऱ्या अशा प्रकारच्या फंडात नेहमीच विकेंद्रित (डायव्हर्सिफाइड इक्विटी) फंडात गुंतवणूक करण्यापेक्षा अधिक धोका असतो. तेजीच्या काळात विकेंद्रित फंडांपेक्षा अधिक फायदा व मंदीच्या काळात अधिक नुकसान असा या फंडांचा परतावा असतो.
बाजाराच्या घसरणीच्या काळात फंडाला मंदीची कमीत कमी झळ लागेल असा प्रयत्न करण्यात निधी व्यवस्थापक बऱ्या पकी यशस्वी झालेत असा दावा ‘डीएसपी ब्लॅकरॉक फोकस २५’ फंडाने वेगवेगळ्या फंडाच्या टप्प्यातील परतावा दरावरून करता येईल. एसअँडपी बीएसई २०० या निर्देशांकातील २५ कंपन्या निवडून गुंतवणूक करणारा हा फंड आहे. फंडाच्या गुंतवणुका बँकिंग (२६.२४%) वाहन उद्योग (१६.०९%) औषध निर्माण (१०.०१%) तेल व नसíगक वायू (९.४९%) व सीमेंट व बांधकाम (७.०६%) या क्षेत्रात आहेत. हा फंड अधिक धोका अधिक परतावा (हाय रिस्क – हाय रिटर्न) प्रकारात मोडणारा फंड आहे. हा फंड एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्यासाठी नाही हे लक्षात ठेऊन साहजिकच या फंडात केवळ तीन ते पाच वष्रे  एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करण्याची शिफारस करत आहे.
mutualfund.arthvruttant@gmail.com