23 October 2020

News Flash

बाजाराचातंत्र कल : ‘अपेक्षित’ घसरण!

निर्देशांक प्रथम सेन्सेक्सवर ३८,००० आणि निफ्टीवर ११,३०० पर्यंत खाली घसरू शकतो.

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

गेल्या लेखात सूचित केल्याप्रमाणे निर्देशांक सातत्याने सेन्सेक्सवर ३८,८०० आणि निफ्टीवर ११,६०० च्या स्तरावर टिकणे नितांत गरजेचे होते. अन्यथा निर्देशांक प्रथम सेन्सेक्सवर ३८,००० आणि निफ्टीवर ११,३०० पर्यंत खाली घसरू शकतो. याची प्रचीती सरलेल्या सप्ताहातील, शुक्रवारच्या साप्ताहिक बंदनी दिली. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स ३७,६७३.३१ / निफ्टी ११,१७४.७५

आताच्या तेजीत जे गुंतवणूकदार सहभागी होऊ शकले नाहीत त्यांना पुन्हा एकवार संधी ही सेन्सेक्सवर ३८,००० ते ३७,४०० आणि निफ्टीवर ११,३०० ते ११,१०० ला असेल हे गेल्या लेखातील वाक्य आज आपण अनुभवत आहोत. अशा गुंतवणूकदारांनी गुंतवणूकयोग्य रकमेचे २० टक्क्यांच्या पाच तुकडय़ांत विभागणी करून प्रत्येक घसरणीत ही रक्कम प्रथितयश कंपन्याच्या समभागात गुंतवावी.

आगामी तिमाही निकालाकडे..

१) टीसीएस :

* तिमाही निकालाची नियोजित तारीख-  गुरुवार, १०ऑक्टोबर

* ४ ऑक्टोबरचा बंद भाव – २,०७८.६५ रुपये

* निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,१०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,१०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,१५० ते २,१७० रुपये. भविष्यात २,१०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २,२५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २,१०० ते २,१५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : २,१०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम २,००० व त्यानंतर १,९०० रुपयांपर्यंत घसरण

२) इंडसइंड बँक :

* तिमाही निकालाची नियोजित तारीख- गुरुवार, १० ऑक्टोबर

* ४ ऑक्टोबरचा बंद भाव – १,२६४ रुपये

* निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,२७० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,२७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,४०० रुपये. भविष्यात १,२७० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,५५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १,२७० ते १,४०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : १,२७० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम १,२१० व त्यानंतर १,१५० रुपयांपर्यंत घसरण

३) इन्फोसिस :

*तिमाही निकालाची नियोजित तारीख – शुक्रवार, ११ ऑक्टोबर

* ४ ऑक्टोबरचा बंद भाव – ७९३.२५ रुपये

* निकालानंतरचा महत्वाचा केंद्रबिंदू स्तर – ७५० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने ७५० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ८०० रुपये. भविष्यात ७५० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ८५० ते ९०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ७५० ते ८०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : ७५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम ७०० व त्यानंतर ६५० रुपयांपर्यंत घसरण

४) अ‍ॅव्हेन्यू सुपर मार्केट्स लिमिटेड (डी मार्ट):

* तिमाही निकालाची नियोजित तारीख- शनिवार, १२ ऑक्टोबर

* ४ ऑक्टोबरचा बंद भाव – १,८९४.८५ रुपये

* निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,८०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,९५० रुपये. भविष्यात १,८०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २,१०० ते२,२०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : १,८०० ते १,९५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : १,८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम १,६७० व त्यानंतर १,५८० रुपयांपर्यंत घसरण.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 1:49 am

Web Title: market trends share market trends senesex nifty abn 97 2
Next Stories
1 अर्थ वल्लभ : फलाटदादा फलाटदादा..सिग्नल पडला आली गाडी 
2 नावात काय? : ‘टू बिग टू फेल’
3 माझा पोर्टफोलियो : पुरती उभारी दूरच!
Just Now!
X