नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे तसेच करविषयक विवरण दाखल करण्याची वेळही नजीक येऊन ठेपली आहे. पगारदार, व्यावसायिक, सल्लागार इत्यादी घटकांनी आपल्या उत्पन्नाचा तपशील सरकारकडे देणे गरजेचे आहे. प्राप्तिकर परतावे भरण्याची अंतिम तारीख सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षी जुल महिन्याच्या शेवटच्या दिवशी येते.
यावर्षी नवे आणि महत्त्वाचे काय?
वार्षिक पाच लाख रुपयांहून जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना आपल्या कराचा परतावा तोदेखील ऑनलाइन भरणे अनिवार्य आहे. पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना ऑनलाइन कर दाखल करण्यातून सूट देण्यात आली आहे, पण त्यावरही अनेक अटी लागू आहेत. प्राप्तिकर विभागाकडील नोंदी अद्ययावत ठेवण्याकरिता करदात्यांनी आपले कर-विवरण ऑनलाइन दाखल करणेच श्रेयस्कर ठरेल.
यावर्षी कर-परताव्याचा फॉर्म भरताना प्रकरण VI A मध्ये अनेक नव्या भागांची भर पडली आहे. उदाहरणार्थ, या वर्षी अनुभाग ‘८० सीसीजी’ मध्ये (राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम) ची भर घालण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या व्यक्तींना भारत सरकारद्वारे गुंतविलेल्या रकमेवर ५० टक्क्यांचे (कमाल रु. २५,०००) कर वजावटीचे लाभ पुरविण्यात आले आहेत.
यावर्षी ‘८० टीटीए’ नावाच्या अजून एका अनुभागाची भर पडली आहे. प्रकरण VI A अंतर्गत कमाल १०,०००/- रुपयांच्या सवलतीचा लाभ त्यायोगे देण्यात आला आहे.
ऑनलाइन कर भरण्याची प्रक्रिया
ऑनलाइन दाखल केलेले कर-परतावे (ई-फाइलिंग) एका डिजिटल फाइल (.xml फाइल) मधून प्रसारित केले जातात. या फाइलमध्ये सर्व उत्पन्न व करविषयक तपशील एका विशिष्ट फॉरमॅटमध्ये असतो आणि तो आयकर विभागाच्या सव्‍‌र्हरवर अपलोड करण्यात येतो. विभागाने पुरविलेल्या एक्सेल फाइलमधून ही वर उल्लेखिलेली एक्सएमएल फाइल तयार करता येते. सॉफ्टवेअरमधून किंवा ई-फायिलग  सेवा देणाऱ्या वेबसाइटवरूनही ती मिळवता येते.
पहिल्यांदाच ऑनलाइन परतावे दाखल करणाऱ्या व्यक्तीला एक्सेल टेम्प्लेटमध्ये सर्व तपशील भरल्यानंतर एक्सएमएल फाइल तयार करणे अवघड वाटते. त्यामुळे अनेक व्यक्ती ऑनलाइन ई-फाइल्िंाग पोर्टल्सच्या सेवांचा लाभ घेतात. यामध्ये त्यांना साध्या प्रश्नांची उत्तरे माहितीदाखल द्यावयाची असतात आणि त्यावरून ती वेबसाइट एका प्रोग्रामच्या आधारे बॅक-एण्डला आवश्यक ती फाइल तयार करते. तसेच तीच फाइल प्राप्तिकर विभागाच्या सव्‍‌र्हरवरही अपलोड करते. अशा प्रकारचा इंटरफेस वापरण्यास सुलभ आणि वेळेची बचत करणारा असतो.
अचूक परतावा कसा तयार करावा?
परतावा दाखल करण्याची सुरुवात करण्याआधी तुमच्या हातात काही कागदपत्रे असणे गरजेचे आहे. जर तुम्ही पगारदार असाल तर तुमच्या नियोक्त्याने पुरविलेला फॉर्म १६ तयार ठेवा. जर तुम्हाला नियत ठेवींवर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळाले असेल तर ती प्रमाणपत्रे हाताशी असणे गरजेचे आहे. तुम्ही नियत ठेवींमधून मिळालेले उत्पन्नही जाहीर केले पाहिजे. बँकेने कोणत्याही प्रकारचा कर कापून घेतला असल्यास तुम्ही परताव्याकरिता अर्ज करू शकता (लागू असल्यास).
जर तुम्हाला व्यवसाय किंवा कन्सल्टन्सी फर्ममधून उत्पन्न मिळत असेल तर तुम्ही ई-फायिलगला सुरुवात करण्याआधी संबंधित ताळेबंद हाताशी असणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या कंपनीबरोबर कंत्राट केले असल्यास तुम्हाला नियोक्त्याकडून ‘फॉर्म १६ए’ मिळालेला असेल, तोदेखील तुमच्यासोबत असू द्यात.
एक्सेल टेम्प्लेटमध्ये किंवा तुम्हाला उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये तुमचा तपशील भरताना काळजी घ्या. हाती असलेल्या कागदपत्रांतील माहितीचा पडताळा करूनच तुमचा तपशील भरा.
हल्ली, मोठ्या कॉर्पोरेट्सबरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका िलकवर क्लिक करून ई-फाईिलग पोर्टलवर ‘फॉर्म १६’चा तपशील इम्पोर्ट करण्याची सुविधा उपलब्ध असते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांकरिता ई-फाईिलग ही अत्यंत सोपी आणि अचूक प्रक्रिया आपोआपच बनते.
पुढे काय करावे?
प्राप्तिकर विभागाकडे कराचा परतावा दाखल केल्यावर आणि तो अचूक आहे असे आढळल्यावर तो स्वीकारला गेला आहे, याचा निर्देश म्हणून पोचपावती मिळते. या पोचपावतीचे दोन प्रकार असतात, डिजिटल स्वाक्षरी असलेली आणि डिजिटल स्वाक्षरी नसलेली (जिला आयटीआर-व्ही) असे म्हणतात. परतावा दाखल करताना दाखल करणाऱ्याने त्याची डिजिटल स्वाक्षरी वापरली असेल तर त्याला डिजिटल स्वाक्षरी असलेली आयटीआर-व्ही मिळते आणि प्रक्रिया समाप्त होते. जर परताव्यावर डिजिटल स्वाक्षरी नसेल तर दाखल करणाऱ्याला स्वाक्षरीकरिता जागा सोडलेली आयटीआर-व्ही मिळते. यावर स्वाक्षरी केलेली प्रत सीपीसी, बंगळुरू या ठिकाणी ई-फाइिलगकरिता १२० दिवसांच्या आत पोहोचणे आवश्यक आहे. आजच्या घडीला बहुतेक भारतीय नागरिक हीच पद्धत वापरतात.
सीपीसीमध्ये तुमची आयटीआर-व्ही पोहोचल्यावर किंवा डिजिटल स्वाक्षरी केलेली पोचपावती मिळाल्यावर सर्व परतावे आयकर विभागाच्या सव्‍‌र्हरवरील स्वयंचलित प्रक्रियेद्वारा पडताळले जातात. सव्‍‌र्हरची परताव्यांवरील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर परतावा दाखल करणाऱ्यास सूचना १४३ (१) मिळते. परतावा दाखल करणाऱ्याने दाखल केलेल्या परताव्यात आणि आयकर विभागाने पडताळणी केलेल्या परताव्यात १०० रुपयांहून अधिक फरक दिसल्यास परतावा दाखल करणाऱ्याने परिस्थितीनुरुप तातडीने कृती करणे गरजेचे असते. काहीही फरक न आढळल्यास ई-फाईिलग प्रक्रिया तिथेच समाप्त होते. रक्कम परत मिळायची असल्यास परतावा दाखल करणाऱ्याला त्याच्या पत्त्यावर त्या रक्कमेचा धनादेश यथावकाश घरपोच मिळतो, अथवा तो थेट त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो.
ई-फाइल का करावे?
प्रत्येक वर्षी परतावा भरणाऱ्या भारतीय नागरिकाकरिता ही उत्तम प्रथा आहे. ज्यांना ऑनलाइन परतावे भरण्यापासून सूट मिळाली आहे त्यांनीदेखील आपले परतावे ऑनलाइन भरावे. कारण त्यामुळे त्यांना बँकेकडून कर्ज घेण्यास किंवा नवा व्यवसाय सुरू करण्याकरिता मदत होऊ शकते. आजकाल ई-फाइिलग ही साधी प्रक्रिया बनलेली असून त्याकरिता फक्त काही मिनिटेच खर्ची घालावी लागतात. परंपरागत पद्धतीपेक्षा या पद्धतीमध्ये कराच्या परताव्याची प्रक्रिया जलद होते. शिवाय, त्यामुळे लांबलचक रांगेत उभे राहायला लागणे, सर्व कागदपत्रे बाळगायला लागणे अशा त्रासातून सुटका होते.
लेखक ‘माय आयटी रिटर्नस्.कॉम’चे संचालक आहेत.

ऑनलाइन कशासाठी?
* यंदाच्या कर-निर्धारण वर्षांपासून वार्षिक पाच लाख रुपयांहून जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना आपल्या कराचा परतावा तोदेखील ऑनलाइन भरणे अनिवार्य.
* वेळ, कागद आणि पसा वाचवण्याकरिता तुमचा कराचा परतावा ऑनलाईन भरा. हल्ली अनेक ई-फाईिलग पोर्टल्स ही सेवा मोफत पुरवतात.
* ज्यांना ऑनलाइन परतावे भरण्यापासून सूट मिळाली आहे त्यांनी देखील आपले परतावे ऑनलाइन भरावे कारण त्यामुळे त्यांना बँकेकडून कर्ज घेण्यास किंवा नवा व्यवसाय सुरू करण्याकरिता मदत होऊ शकते.