• प्रश्न : मी माझे आíथक वर्ष २०१३-१४ (कर निर्धारण वर्ष २०१४-१५) सालचे प्राप्तिकर विवरणपत्र २ जुल, २०१४ रोजी दाखल केले होते. मी मुदत ठेवींवरील व्याज विवरणपत्रात दाखविले नव्हते. ते दाखविले तर मला १,३०,०१७ रुपये कर देय आहे. मी सुधारित विवरणपत्र दाखल केले तर मला किती व्याज भरावे लागेल?

– सौ. सुनीता धारवाडकर

उत्तर : आपल्या देय करावर २३४ ब आणि २३४ क या दोन कलमानुसार व्याज भरावे लागेल. २३४ ब या कलमानुसार ९०% पर्यंत देय रक्कम त्या आíथक वर्षांच्या ३१ मार्चपर्यंत भरणे गरजेचे असते. आपले आíथक वर्ष २०१३-१४ आहे. त्यामुळे आपल्याला ३१ मार्च २०१४ पर्यंत कर भरणे गरजेचे होते. या कलमानुसार आपल्याला १% प्रतिमहिना व्याज भरावे लागते. आपण हा कर आत्ता म्हणजे फेब्रुवारी २०१६ मध्ये भरला तर एप्रिल, २०१४ पासून फेब्रुवारी,२०१६ पर्यंत १% प्रतिमहिना या दराने २३ महिन्यांसाठी 23% इतके व्याज म्हणजे २९,९०४ रुपये (१,३०,०१७) २३%) कलम २३४ ब या कलमाप्रमाणे भरावा लागेल. या शिवाय कलम २३४ क प्रमाणे आगाऊ कर न भरल्यामुळेसुद्धा व्याज भरावे लागेल. या कलमानुसार जर देय कर (उद्गम कर – टीडीएस वजा जाता) १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर तो तीन हप्त्यात भरावा लागतो. कर या तीन हप्त्यात भरला नाही किंवा कमी भरला तर त्यावर १% प्रमाणे व्याज भरावे लागते. आपला देय कर १,३०,०१७ रुपये हा १५ सप्टेंबर, २०१३ पूर्वी ३०% म्हणजे ३९,००५ रुपये, १५ डिसेंबर, २०१३ पूर्वी ६०% म्हणजे ७८,०१० रुपये आणि १५ सप्टेंबरपूर्वी १००% म्हणजेच १,३०,०१७ रुपये कर भरणे अपेक्षित होते. हा न भरल्यामुळे या कलमानुसार खालीलप्रमाणे व्याज भरावे लागेल :
chart1२३४ क या कलमानुसार व्याज हे ३१ मार्च, २०१४ पर्यंतच भरावे लागते आणि त्यानंतर २३४ ब या कलमानुसार व्याज भरावे लागते. त्यामुळे आपल्याला एकूण ३४,७१४ रुपये (कलम २३४ ब प्रमाणे २९,९०४ रुपये आणि कलम २३४ क प्रमाणे ४,८१० रुपये) व्याज भरावे लागेल. आपला देय कर आगाऊ भरल्यास व्याज भरावे लागत नाही.

  • प्रश्न : मी जानेवारी, २०१५ मध्ये अमेरिकेमध्ये स्थायिक झाले. मला आता अमेरिकेतील ग्रीन कार्ड मिळाले आहे. माझी पेन्शन फंड योजना बंद करून २०१५ मध्ये पसे परत घेतले. मला बँकेतील व्याजाच्या आणि पेन्शन फंडातील उत्पन्न दाखवून आíथक वर्ष २०१५-१६ (कर निर्धारण वर्ष २०१६-१७) चे विवरणपत्र भरावे लागेल का?

– प्राची भातंब्रेकर

उत्तर : भारतातील उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर (अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख रुपये, ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख रुपये आणि इतरांसाठी २,५०,००० रुपये) विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. जर आपल्या उत्पन्नावर उद्गम कर कापला गेला असेल तर विवरणपत्र भरणे गरजेचे आहे.

  • प्रश्न : मी काही वर्षांपूर्वी खासगी नोकरीतून निवृत्त झालो. माझे वय ६६ वष्रे आहे. मी माझे पसे सहकारी बँकेत मुदत ठेवीत गुंतविले आहेत. शिवाय माझ्याकडे त्या बँकेचे समभाग सुद्धा आहेत. आतापर्यंत बँक त्यावर उद्गम कर कापत नव्हती. आता त्यांनी उद्गम कर कापला आहे. माझे उत्पन्न हे कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी आहे. मला हा कापलेला उद्गम कर परत मिळेल का?

– किशोर सावंत

उत्तर : आपण ज्येष्ठ नागरिक आहात, आपण १५ ऌ फॉर्म भरून दिला असता तर बँकने उद्गम कर कापला नसता. बँकेने कापलेला उद्गम कर परत मिळविण्यासाठी आपल्याला विवरणपत्र ऑनलाईन दाखल करावे लागेल आणि त्यात कर परताव्याचा दावा करावा लागेल. हा दावा केल्यानंतर आपल्याला कर परतावा मिळेल. आता १५ जी आणि १५ एच फॉर्म ऑनलाईन दाखल करण्याची तरतूद नुकतीच करण्यात आली आहे. ही पद्धत पूर्वीच्या पद्धतीपेक्षा सोपी आहे.

 

  • प्रश्न : मी एक घर बिल्डरकडून विकत घेतले आहे. त्यासाठी मी गृह कर्ज घेतले आहे. या घराचा ताबा मला मे, २०१६ मध्ये मिळणार आहे. गृह कर्जाचा हफ्ता मी आतापासून भरत आहे. मला याची वजावट उत्पन्नातून घेता येईल का?

– डी. नेहा

उत्तर : प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीप्रमाणे गृह कर्जाच्या व्याजाची वजावट ही घराचा ताबा घेतल्यानंतरच घेता येते. घराचा ताबा घेण्यापूर्वी भरलेल्या व्याजाची वजावट घराचा ताबा घेतलेल्या वर्षांपासून ५ वर्षांत विभागून घेता येते. उदा. आपण २०१६-१७ या आíथक वर्षांत घराचा ताबा घेतला आणि २०१५-१६ आíथक वर्षांत आपण एक लाख रुपये इतके गृहकर्जावरील व्याज भरले. या एक लाख रुपयांची १ पंचमांश रक्कम म्हणजेच २०,००० रुपये आíथक वर्षांत २०१६-१७, आíथक वर्ष २०१७-१८ मध्ये २०,००० रुपये अशी आíथक वर्ष २०२०-२१ पर्यंत प्रत्येकी २०,००० रुपये वजावट घेता येईल. परंतु एकूण व्याजाची वजावट ही २ लाख रुपयांपर्यंतच घेता येते. गृहकर्जाच्या मुद्दल परतफेडीची (घराचा ताबा घेण्यापूर्वीच्या) वजावट ताबा न घेतल्यामुळे मिळू शकणार नाही.

 

  • प्रश्न : मी अनिवासी भारतीय आहे. मी निवासी भारतीय असताना एक घर विकत घेतले होते. हे घर मी जून २००१ मध्ये ३२ लाख रुपयांना विकत घेतले होते. आता मला हे घर विकायचे आहे आणि एक मोठे घर विकत घ्यावयाचे आहे. एका व्यक्तीने हे घर १ कोटी २५ लाख रुपयांना खरेदीची इच्छा दर्शविली आहे आणि त्यावर २०% उद्गम कर  कापणार असे सांगितले. माझ्या मते या घर विक्रीतून दुसरे घर विकत घेणार असल्यामुळे मला पहिल्या घरावर झालेल्या नफ्यावर भांडवली कर भरावा लागणार नाही. तर मग २०% उद्गम कर कसा टाळता येईल?

– भूषण चोरघे

उत्तर : आपण अनिवासी भारतीय असल्यामुळे कलम १९५ नुसार उत्पन्नावर उद्गम कर कापण्याची जबाबदारी घर विकत घेणारयावर टाकली आहे. हा उद्गम कर प्राप्तिकर कायद्याप्रमाणे भराव्या लागणारया एकूण कराएवढा असतो. आपण निवासी भारतीय असता तर १% उद्गम कर कापला गेला असता. हा कर टाळावयाचा असेल तर आपल्या अखत्यारीतील प्राप्तीकर अधिकाऱ्याकडे फॉर्म १३ भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्र जोडून अर्ज करता येतो आणि आपल्या या व्यवहारावर कलम १९७ नुसार कर कपात न करण्याचे प्रमाणपत्र प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून मिळवता येते. हे प्रमाणपत्र घर खरेदी करणारयाला दिल्यास त्यावर उद्गम कर कापला जाणार नाही.

 

  • प्रश्न :मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. माझे वय ६५ वष्रे आहे. माझे आíथक वर्ष २०१५-१६ सालचे उत्पन्न खालीलप्रमाणे :

मुदत ठेवींवरील व्याज =  ७,७५,००० रु.

शेअर्सवरील लघु मुदतीचा भांडवली नफा = १,१५,००० रु.

बचत खात्यावरील व्याज = १४,५०० रु.

घरभाडे उत्पन्न = १,५०,००० रु.

मी कलम ८० क प्रमाणे दीड लाख रुपयांची गुंतवणूक सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत केली आहे. मला किती कर भरावा लागेल तो कर कधी भरला तर चालेल?

– बळवंत लागू

उत्तर : आपले उत्पन्न आणि देय कर हे सोबतच्या कोष्टकप्रमाणे असेल.

मालमत्ता कराची रक्कम आपण कळवली नसल्यामुळे शून्य दाखविली आहे. शेअर्सवरील विक्रीवर शेअर उलाढाल कर (STT) भरला आहे असे गृहीत धरण्यात आले आहे. हा वरील आयकर आपल्याला जुल २०१६ पर्यंत भरता येईल, आपण ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे आणि आपल्या उत्पन्नात धंदा व्यवसायाचे उत्पन्न नसल्यामुळे आपल्याला आगाऊ कराच्या तरतुदी लागू होत नाहीत.
chart2

  • लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार आहेत. वाचकांनी त्यांना आपले करविषयक प्रश्न ई-मेल : pravin3966@rediffmail.com वर पाठवावेत.