News Flash

रिलायन्स स्मार्ट पेन्शन प्लॅन स्मार्ट पण पेन्शन?

भारतामधील अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या अनिल धीरूभाई अंबानी या बलाढय़ उद्योग समूहाच्या रिलायन्स लाइफ इन्शुरन्स या कंपनीची युलिप प्रकारात मोडणारी ही पॉलिसी.

| July 7, 2014 01:01 am

भारतामधील अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या अनिल धीरूभाई अंबानी या बलाढय़ उद्योग समूहाच्या रिलायन्स लाइफ इन्शुरन्स या कंपनीची युलिप प्रकारात मोडणारी ही पॉलिसी. आता पेन्शन हा प्रकार बंद झाला आहे. त्यामुळे ‘निवृत्तीनंतर काय?’ असा विचार ज्या काही थोडय़ाफार तरुणांना (आणि मुख्यत: त्यांच्या पालकांना) भेडसावत असतो असे तरुण या पॉलिसीच्या नावामधील ‘स्मार्ट’ आणि ‘पेन्शन’ या दोन शब्दांना भुलून ही पॉलिसी घेतात. संदीप हा अशाच तरुणांपकी एक. अतिशय हुशार, उच्च पदवीधर आणि तरुण वयामध्ये बऱ्याच मोठय़ा हुद्दय़ावर नोकरी करणारा. कामाच्या व्यापामुळे त्याला इतर गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याकारणाने त्याने एका विमा विक्रेत्याकडे पेन्शन संबंधित प्लॅनची विचारणा केली आणि त्या विक्रेत्याने त्याला रिलायन्स स्मार्ट पेन्शन प्लॅनचे लेखाचित्र दिले.
पॉलिसीची वैशिष्टय़े :
संदीपने कंपनीकडे २० वष्रे पसे जमा करायचे. त्या पशांमध्ये कंपनी संदीपला विमाछत्र देणार आणि त्याच्या पशांची गुंतवणूकही करणार.
पॉलिसीची २० वष्रे पूर्ण झाल्यावर संदीपच्या खात्यामध्ये जी रक्कम जमा झालेली असेल त्यावर त्याला वार्षकि पेन्शन सुरू होणार.
संदीपचे वय : ३३ वष्रे
पॉलिसी आणि प्रीमियम भरायचा         
कालावधी : २० वर्षे
वार्षकि प्रीमियम : २ लाख रुपये
विमाछत्र : पहिल्या वर्षांसाठी २,१०,००० रुपये आणि दरवर्षी वाढ होत जाऊन पॉलिसीच्या २०व्या वर्षी ७७,६५,९३८ रुपये
पॉलिसीचे लाभ :
वार्षकि प्रीमियमच्या रकमेवर कंपनीने ०.०९ टक्के परताव्याची हमी दिली आहे. त्यानुसार २० वर्षांमध्ये खात्रीलायक अशी ४०,४०,९०१ रुपये इतकी गंगाजळी तयार होणार. या गंगाजळीवर संदीपला २,८४,९०१ रुपये इतकी वार्षकि पेन्शन मिळणार. परंतु त्या पेन्शनची गॅरेंटी नाही. २० वर्षांनंतर बाजारात जो व्याजाचा दर असेल त्यानुसार त्याला पसे मिळणार.
संदीपने प्रीमियम म्हणून जमा केलेल्या रकमेमधून अनेक प्रकारचे खर्च वजा जाता जी निव्वळ रक्कम उरते त्याची गुंतवणूक करून प्राप्त झालेला अतिरिक्त लाभ संदीपच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याबाबत कंपनी कोणत्याही प्रकारची हमी देत नाही.
जर ४ टक्क्यांनुसार परतावा मिळाला तर २० वर्षांमध्ये हमी दिलेल्या लाभासकट त्याची गंगाजळी होणार आहे ४९,७४,९३८ रुपये.
संदीपच्या नशिबाने त्याला ८ टक्क्यांनुसार परतावा प्राप्त झाला तर त्याची एकूण गंगाजळी होणार आहे ७७,६५,९३८ रुपये.
उच्चशिक्षित असूनही संदीपला हे ४ टक्के आणि ८ टक्के यांचे गौडबंगाल लक्षात येईना. हे सर्व समजून घेण्यासाठी त्याने एका तज्ज्ञाची भेट घेतली. त्याने संदीपला सांगितले, ‘हे ४ टक्के आणि ८ टक्क्यांनुसार दिसणारे आकडे कधीच ‘मॅच’ होत नाहीत. विमा नियामक इर्डाने तसा नियमच घालून दिल्याने विमा कंपन्यांना तसे दाखवावे लागते. टक्केवारीचा हिशोब करायच्या फंदात न पडता त्या मथळ्यांखाली जे आकडे दाखविले असतात ते फक्त आपल्या हिशेबासाठी घ्यायचे’. हा ‘जर’ – ‘तर’चा संदिग्ध प्रकार संदीपला पसंत पडला नाही, कारण त्याच्या निवृत्तीनंतरच्या पशाबाबत त्याला सुस्पष्ट आणि थोडय़ाफार प्रमाणात ठोस अशी योजना हवी होती. म्हणून त्याने त्या तज्ज्ञाकडे दुसऱ्या पर्यायाबाबत विचारणा केली ज्यामध्ये विमाछत्रही असेल आणि खात्रीलायक ठोस परताव्यानुसार त्याची पेन्शनची समस्या सोडविण्यास मदत होईल.
तज्ज्ञाचा सल्ला :
१. संदीपचे वार्षकि उत्पन्न १२ लाख रुपये आहे आणि त्यानुसार त्याची आíथक किंमत (ऌ४ेंल्ल एूल्ल्रेू श्ं’४ी) सुमारे २.४० कोटी रुपये आहे. त्यामुळे त्याचे विमाछत्र २ कोटी रुपयांचे तरी असणे आवश्यक आहे.
२. रिलायन्स स्मार्ट पेन्शन प्लॅनमध्ये त्याचे विमाछत्र फक्त २० वर्षांच्या कालावधीचे आहे. म्हणजे त्याच्या वयाच्या ५२ वर्षांपर्यंतचेच आहे. तो वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त होणार आणि त्यानंतर त्याने काही खासगी नोकरी वगरे केली तर त्याची काहीतरी आíथक किंमत असणार आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर चार ते पाच वष्रे त्याचे विमाछत्र असणे आवश्यक आहे.
३. संदीप पुढील २५ वष्रे नोकरी करणार आहे. त्यामुळे त्याला पेन्शनची गरज आहे ती त्याच्या वयाच्या ५९व्या वर्षांपासून. त्यामुळे त्याची गुंतवणूक २५ वर्षांची असावी हे जास्त उचित आहे.
पर्याय :
९५ टक्क्यांपेक्षा जास्त ‘क्लेम सेटलमेंट रेशिओ’ (दावे निकाली काढण्याचे प्रमाण) असलेल्या कंपनीची संदीपने २ कोटी रुपयांच्या विमाछत्राची, ३० वर्षांच्या कालावधीची, प्युअर टर्म पॉलिसी घेतली तर त्याच्या वार्षकि प्रीमियमची रक्कम होते ३० हजार रुपये. पॉलिसीच्या ३० वर्षांच्या प्रीमियमची एकूण रक्कम ९ लाख रुपये होते. रिलायन्स स्मार्ट पेन्शन प्लॅनची प्रीमियमची एकूण रक्कम ४० लाख रुपये व बचत ३१ लाख रुपये होते. त्यापकी संदीपने दरवर्षी १ लाख रुपये प्राप्तिकरामध्ये सूट मिळणाऱ्या ठोस परतावा पर्यायामध्ये गुंतविले तर २५ वर्षांनंतर म्हणजे त्याच्या वयाच्या ५८व्या वर्षी त्याची खात्रीलायक अशी गंगाजळी ८८,०७,१२१ रुपये होते. तरीही त्याच्याकडे ६ लाख रुपये वाचतात. ते त्याने ज्या योजनांनी सुरुवातीपासूनच्या काळापासून द.सा.द.शे. २४ टक्क्यांपेक्षा जास्त परताव्याची नोंद केली आहे अशा म्युच्युअल फंडांच्या इक्विटी ग्रोथ योजनेमध्ये मासिक ५ हजार रुपयांच्या एसआयपीद्वारा (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लॅन) गुंतविले तर १० वर्षांनी म्हणजे त्याच्या वयाच्या ४३व्या वर्षी (१२ टक्के परतावा गृहीत धरून गणित मांडले तर) सुमारे ११.६० लाख रुपयांची गंगाजळी तयार होते.
तुलनात्मक आढावा :
१. रिलायन्स स्मार्ट पेन्शन प्लॅनमध्ये पहिल्या वर्षांचे विमाछत्र २.१० लाख आणि ज्याची हमी नाही अशा दरवर्षी वाढत जाणाऱ्या विमाछत्रानुसार ५२व्या वर्षांचे कमाल विमाछत्र ७७.६५ लाख रुपये पर्यायी प्युअर टर्म पॉलिसीचे पहिल्या वर्षांपासूनचे विमाछत्र २ कोटी रुपये.
२. पेन्शन प्लॅनमध्ये संदीपच्या वयाच्या ५३व्या वर्षी (ज्याची हमी नाही अशी) ७१.६५ लाख रुपयांपर्यंतची गंगाजळी तयार होते (प्रत्यक्षात ४०.४० लाख ते ७१.६५ लाख रुपये). पर्यायी गुंतवणुकीमध्ये त्याच्या वयाच्या ४३व्या वर्षी (म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या ऐतिहासिक अभिवृद्धीच्या अर्धी वाढ गृहीत धरूनही) विना हमीची ११.६१ लाख रुपयांची गंगाजळी तयार होते आणि ५९व्या वर्षी खात्रीलायक अशी ८८.०७ लाख रुपयांची गंगाजळी तयार होते.
हा पर्याय संदीपची जोखीम घेण्याची क्षमता आणि त्याच्यासाठी योग्य असणाऱ्या विमाछत्राचा विचार करून बनविण्यात आला आहे. त्याच्या कमाईची सुमारे २५ ते २७ वष्रे बाकी आहेत. त्यामुळे त्याला पूर्वनियोजित जोखीम घ्यायची संधी आहे. त्यानुसार त्याने ठोस पर्यायामधील गुंतवणुकीची रक्कम अर्धी करून ती म्युच्युअल फंडाच्या प्राप्तिकर बचतीच्या (एछरर) योजनेमध्ये गुंतविली तर त्याची गंगाजळी होते १.१९ कोटी रुपये (ठोस पर्याय ४४.०४ लाख आणि म्युच्युअल फंड ७४.६६ लाख रुपये) आणि ती रक्कम प्राप्तिकर वजा जाता ६ टक्के परताव्याच्या मुदत ठेवीमध्ये गुंतविली तर त्याची वार्षकि ७.१४ लाख रुपयांची पेन्शन सुरू आहे.
निष्कर्ष :
जीवन विमा आणि गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारे केली तर तितक्याच पशांमध्ये जास्त विमाछत्र मिळते आणि मोठय़ा प्रमाणात गंगाजळी बनविता येते.
(सदर लेखामधील माहिती प्रत्यक्ष लेखाचित्रावरून घेतली आहे आणि उद्देश विमाइच्छुकांना जागृत करायचा आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 1:01 am

Web Title: reliance smart pension plan smart but pension
टॅग : Arthvrutant
Next Stories
1 म्युच्युअल फंड की मुदत ठेव ?
2 आता ऑनलाइन ट्रेिडग खाते सहकारी बँकांतूनही उघडणे शक्य
3 शॉर्ट टर्म फंड सद्य कालानुरूप सर्वोत्तम पर्याय
Just Now!
X